Sandeep Kshirsagar News : बीडमध्ये मराठा आंदोलनाचा उद्रेक; आमदार संदीप क्षीरसागरांचे घरंही पेटवले!

Maratha Agitation : आज दिवसभरात बीडमध्ये अनेक जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत.
Sandeep Kshirsagar News :  बीडमध्ये मराठा आंदोलनाचा उद्रेक; आमदार संदीप क्षीरसागरांचे घरंही पेटवले!
Sarkarnama
Published on
Updated on

Beed Maratha Reservation : राज्यात मराठा आंदोलन आता अधिकच तीव्र होत आहे. आंदोलकांचा आता संयम सुटताना दिसत आहे. याचे पडसाद बीड जिल्ह्यात सर्वाधिक दिसत आहेत. एसटी महामंडळाची बस जाळल्यानंतर आता आंदोलकांनी राजकीय नेत्यांच्या घरांकडे आपला मोर्चा वळवल्याचे दिसत आहे.

आज दिवसभरात बीडमध्ये अनेक जाळपोळीच्या घटना घडल्या, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे घरंही पेटवण्यात आल्याने, एकच खळबळ उडाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sandeep Kshirsagar News :  बीडमध्ये मराठा आंदोलनाचा उद्रेक; आमदार संदीप क्षीरसागरांचे घरंही पेटवले!
Maratha Reservation : मराठा आंदोलनाला हिंसक वळण; माजलगाव नगर परिषद पेटवली

आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरावर दगडफेकही करण्यात आली. त्यासोबतच संतप्त आंदोलकांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यालयासह घरही पेटवलं आहे. यामध्ये त्यांच्या घराचे व कार्यालयाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.

नेहमीप्रमाणे शहरात साखळी उपोषण सुरू होते. आंदेालकांनी दुपारी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती, जिल्हा परिषद, मुख्य प्रशासकीय इमारत, जिल्हा आरोग्य अधिकारी, दुय्यम निबंधक आदी कार्यालये बंद केली. आंदोलकांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना बाहेर काढून नंतर कार्यालयांना टाळे ठोकण्यात आले.

यानंतर आंदोलकांनी सुभाष रोडवर जाऊन या ठिकाणी असलेले बॅरिकेट रस्त्यावर आडवे टाकून बाजारपेठ बंद केली. दगडफेकीमुळे शहरात तणाव निर्माण झाला आणि बाजारपेठ बंद झाली. तसेच आंदोलकांनी यापूर्वी समाजाबद्दल टिप्पणी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या सोन्याच्या दुकानांवर दगडफेक करण्यात आली.

तसेच, आमदार प्रकाश सोळंके यांचे बंधू सुंदरराव सोळंके यांचा बंगला आणि समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष सुभाष राऊत यांचे जालना रोडवरील सनराईज हॉटेल आंदोलकांनी जाळले. याशिवाय आंदोलकांनी माजलगाव नगर परिषदेच्या इमारतीलाही आग लावली आहे. यामध्ये मोठे नुकसान झाले आहे.

Sandeep Kshirsagar News :  बीडमध्ये मराठा आंदोलनाचा उद्रेक; आमदार संदीप क्षीरसागरांचे घरंही पेटवले!
Maratha Reservation: मंत्री विखेंच्या राहात्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोला काळे फासले

याशिवाय आज दिवसभरात धैर्यशील सोळंके यांचा बीड येथील बंगलाही जाळण्यात आला. तसेच, बीड जिल्हा भाजप अध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांचे संपर्क कार्यालय आयोजकांकडून पेटवण्यात आले. याशिवाय अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण आणि परळी विधानसभा अध्यक्ष गोविंद देशमुख या दोघांनी आपल्या पदाचे राजीनामे देत साखळी उपोषणात सहभाग घेतला.

(Edited by- Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com