NCP MLA Vikram Kale PA fraud : बीडचा गुन्हेगारी 'पॅटर्न'; आमदार काळेंना 'झटका' अन् सरपंचाला घातला 'गंडा'

NCP MLA Vikram Kale PA Cheats Beed Wadwani Kanhapur Sarpanch : आमदार विक्रम काळे यांचा स्वीय सहाय्यक असल्याची बतावणी करत सरपंच महिलेची फसवणूक केली आहे.
NCP MLA Vikram Kale PA fraud
NCP MLA Vikram Kale PA fraudSarkarnama
Published on
Updated on

NCP MLA Vikram Kale news : राज्यात बीडमधील गुन्हेगारी चर्चेत आहे. तिथल्या गुन्हेगारीच्या वेगवेगळ्या पॅटर्नमुळे राज्य ढवळून निघालं आहे. आता बीडमधील गुन्हेगारी पॅटर्नचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार विक्रम काळे यांना बसला आहे.

आमदार काळे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगत एकाने वडवणी तालुक्यातील कान्हापूर गावच्या महिला सरपंचाला लाखो रूपयांना गंडा घातला आहे.

महिला सरपंच राधा खताळ यांच्या पतीने उत्तरेश्वर खताळ (वय 30) यांनी बीड (BEED) पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीवरून नयन जयराम शेजुळ (रा. छत्रपती संभाजीनगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. नयन शेजुळ याने फोनवर संपर्क साधून, बनावट मेलद्वारे एक कोटी रूपयांचे टेंडर मिळवून देतो, असे सांगून ही फसवणूक केली आहे.

उत्तरेश्‍वर खताळ यांच्या पत्नी राधा खताळ या सरपंच आहेत. नयन शेजुळ यांनी राधा खताळ यांना फोनद्वारे संपर्क साधून, मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) आमदार विक्रम काळे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगितले. आमदार काळे छत्रपती संभाजीनगर शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेवर प्रतिनिधीत्व करतात.

NCP MLA Vikram Kale PA fraud
Devendra Fadnavis legal notice : हिंदीसाठी खोटं बोलले? देवेंद्र फडणवीसांना धाडली कायदेशीर नोटीस

2024-25 या आर्थिक वर्षातील जिल्हा परिषद अंतर्गत विकास कामांचे टेंडर उपलब्ध करून देतो, असे सांगून, नयन शेजुळ यानेही फसवणूक केली. फसवणूक करताना, समोरच्याची खात्री पटावी म्हणून, त्याने बनावट मेलद्वारे टेंडरची खोटी निविदा देखील पाठवल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्यात मोठी टोळी कार्यरत असल्याचा पोलिसांना संशय आहे.

NCP MLA Vikram Kale PA fraud
MNS-Shivsena UBT News : मनसे सोबत युती करायची का ? उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर पदाधिकारी- कार्यकर्त्यांशी खलबते!

एक कोटींच्या सिमेंट रस्त्याच्या कामासाठी 10 लाख रुपयांची मागणी नयन शेजुळ याने केली. ऑगस्ट 2024 मध्ये त्याने जिल्हा परिषद आवारात 50 हजार रुपये घेतले. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात छत्रपती संभाजीनगरला बोलावून घेत सुहास लंगडे आणि समीर बशीर शेख यांच्यासमक्ष सहा लाख 20 हजार रुपये घेतले, असे खताळ यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, नयन शेजुळ हा आमदार विक्रम काळे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगत होतो. परंतु तो त्यांचा स्वीय सहाय्यक नसल्याची माहिती समोर येत आहे. नयन शेजुळ याने आमदार विक्रम काळे यांच्या नावाने किती जणांची फसवणूक केली आहे, याची आता चर्चा होत आहे. पोलिस देखील त्याअनुषंगाने तपास करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com