Ncp News : राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी कल्याण आखाडे...

Dhnanjay Munde : ओबीसी सेलची कामगिरी अधिक जोमाने वृद्धिंगत होत राहील, हा विश्वास आहे, असे ट्विट मुंडे यांनी केले आहे.
Ncp News, Beed
Ncp News, BeedSarkarnama

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Ncp) ओबीसी सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी बीडच्या कल्याण आखाडे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेवरून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज मुंबई येथे त्यांची निवड जाहीर करत त्यांना नियुक्ती पत्र दिले. कल्याण आखाडे हे सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.

Ncp News, Beed
Pankaja Munde Letter To CM: हज यात्रेकरूंसाठी मुंबई विमानतळाचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, मुख्यमंत्र्यांना पत्र..

याच सावता परिषदेच्या माध्यमातून राज्यातील २७ जिल्ह्यांमध्ये आखाडे यांनी आपला जनसंपर्क वाढवला. तीर्थक्षेत्र अरण येथे मोठा मेळावा देखील सावता परिषदेच्या माध्यमातून ते घेत असतात. आखाडे हे पुर्वी भाजपमध्ये कार्यरत होते. दिवंगत गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी संघटनेचे काम केले होते. मात्र गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता.

राष्ट्रवादीत त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली, याची दखल घेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सूचनेनूसार आखाडे यांच्यावर आता ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामुळे आता (Beed News) बीड जिल्ह्यासह सावता परिषदेचे जाळे असणाऱ्या २७ जिल्ह्यांमधील ओबीसीची मोठी ताकद राष्ट्रवादीच्या पाठीशी उभी राहणार आहे.

आखाडे यांच्या निवडीचे जिल्ह्यात स्वागत होत असून माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी देखील कल्याण आखाडे यांचे अभिनंदन केले आहे. आमचे स्नेही तथा सावता परिषदेचे अध्यक्ष कल्याण काका आखाडे यांची राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल काकांचे मनापासून अभिनंदन. आपल्या नेतृत्वात ओबीसी सेलची कामगिरी अधिक जोमाने वृद्धिंगत होत राहील, हा विश्वास आहे, असे ट्विट मुंडे यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com