NCP Sharad Pawar : तुतारी वाजवायची इच्छा; पक्षाच्या तिजोरीत टाका 10 हजारांचा निधी

NCP Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला लोकसभेत मिळालेल्या भरभरून यशाने पक्षाचा कॉन्फीडन्स कमालीचा वाढला आहे. आता विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने प्रत्येक जिल्ह्यात विधानसभा निहाय इच्छुकांकडून अर्ज मागवले आहेत.
NCP Sharad Pawar
NCP Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Beed News, 31 August : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला लोकसभेत मिळालेल्या भरभरून यशाने पक्षाचा कॉन्फीडन्स कमालीचा वाढला आहे. आता विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने प्रत्येक जिल्ह्यात विधानसभा निहाय इच्छुकांकडून अर्ज मागवले आहेत.

पण, उमेदवारी मागण्याची हौस आता 10 हजार रुपयांना पडणार आहे. उमेदवारी मागणीच्या अर्जासोबत पक्षाच्या नावे 10 हजार रुपयांचा धनाकर्ष जोडायचा आहे. पक्षात फुट पडल्यानंतर पक्षाच्या तिजोरीच्या मालकीचा मुद्दा जरी वादात असला तरी नव्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCP SP) तिजोरीत आता इच्छुकांमुळे निधी येत आहे.

लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीतील यशामुळे पक्षाकडे इच्छुकांची गर्दीही वाढल्याचे चित्र आहे. मागच्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली. अजित पवार (Ajit Pawar) आपल्या समर्थक आमदारांसह महायुतीत सहभागी झाले. त्यांना उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थ मंत्रीपद भेटले. त्यांच्या समर्थकांनाही सत्तेत मंत्रीपदे मिळाली.

NCP Sharad Pawar
Ajit Pawar : अजित पवारांच्या नजरेतून सुटली नाही दुफळी; विधानसभेची अधिकच चिंता वाढली

दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नावाने नवा पक्ष काढला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या पक्षाला तुतारी वाजविणारा माणूस हे चिन्ह भेटले. प्रमुख नेते सोडून गेलेले, निवडणुकीच्या तोंडावर नवे चिन्ह त्यामुळे काय होणार असा प्रश्न असताना पक्षाने घवघवीत यश मिळवले.

विशेष म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची या निवडणुकीत भलतीच पिछेहाट झाली. आता सगळ्याच पक्षांनी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. सत्तेतल्या भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने शासनाच्या योजनांचा उहापोह सुरु केला आहे. तर, याच नव्याने हाती घेतलेल्या विविध येाजना घेऊन जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस लोकांमध्ये जात आहे.

NCP Sharad Pawar
Rohit Pawar : रोहित पवारांना आठवले 'माफीवीरांचे' कारनामे; मग काय संस्कारसह सर्वच काढलं...

तर इकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने देखील शिव स्वराज्य यात्रेच्या निमित्ताने राज्यभर विविध मतदारसंघांचे दौरे केले आहेत. आता इच्छुकांकडून उमेदवारी मागणीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. लोकसभेतील यशामुळे पक्षाकडे इच्छुकांची संख्या इतर पक्षांच्या तुलनेने अधिक आहे. आता उमेदवारी मागण्यासाठी 10 हजार रुपयांचा धनाकर्ष पक्षनिधी म्हणून सोबत जोडावा लागत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com