Ajit Pawar : अजित पवारांच्या नजरेतून सुटली नाही दुफळी; विधानसभेची अधिकच चिंता वाढली

In front of the NCP faction in Beed : राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा बीडमध्ये होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दुफळी अधिकच गडद झाली.
Ajit Pawar 2
Ajit Pawar 2Sarkarnama
Published on
Updated on

Beed News : महायुतीमधील शिवसेनेची जागा असलेल्या बीड मतदार संघावर दावा ठोकत उमेदवारीसाठी स्पर्धा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुफळी खुद्द पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या दौऱ्यातही लपली नाही.

बहुतांशी पदाधिकाऱ्यांनी पवारांचे हेलिपॅडवर स्वागत करुन जनसन्मान यात्रेच्या सभेला आणि फेरीला दांडी मारली.

राज्य सरकारच्या विविध योजनांचा उहापोह करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) राज्यभरात जनसन्मान यात्रा काढली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, कृषी मंत्री धनंजय मुंडे, महिला आघाडीच्या रुपाली पाटील चाकणकर आदी नेते या यात्रेसाठी बीडला आहे.

Ajit Pawar 2
VIDEO : संतापजनक! प्रश्न मांडणाऱ्या शेतकऱ्याची तानाजी सावंत यांनी काढली लायकी; भर बैठकीत राडा

तत्पूर्वी चार दिवसांपूर्वी जनसन्मान यात्रेच्या तयारीच्या आढावा बैठकीला सर्वच नेते हजर होते. मात्र, सकाळी अजित पवारांचे (Ajit Pawar) हेलिपॅडवर आगमन झाले आणि बहुतांशी नेत्यांनी तिथेच पवारांना बुके देत स्वागत केले. पण पुढे मुख्य कार्यक्रमापासून लांब राहिले. एकप्रकारे काढता पाय घेतला.

Ajit Pawar 2
Ajit Pawar And Yogesh Kshirsagar : मुंडेंकडून ‘लिफ्ट’, पवारांकडून ‘बळ’; राष्ट्रवादीच्या जनसन्मावर क्षीरसागरांचा वरचष्मा

पदाधिकाऱ्यांची कार्यक्रमाकडे पाठ

व्यासपीठ आणि मंडप उभारणी तसेच सर्व कार्यक्रमावर डॉ. योगेश क्षीरसागर आणि सारिका क्षीरसागर यांचा वरचष्मा असल्याने पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बबन गवते, माजी गटनेते फारुक पटेल, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे बीड विधानसभा अध्यक्ष अमर नाईकवाडे, पक्षाचे तालुकाध्यक्ष महादेव उबाळे, शहराध्यक्ष बाळासाहेब गुजर यांच्यासह माजी नगरसेवक कार्यक्रम स्थळाकडे फिरकले देखील नाहीत.

शिवसेनेच्या जागेवर डोळा

महायुतीत असलेला मित्रपक्ष शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडे ही जागा आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिथे योगेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून जोर लावत आहेत. अजित पवार यांची जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने योगेश क्षीरसागर यांनी चाचपणी करत असल्याची चर्चा आहे. तशीच राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमधील त्यांचा मित्रपक्ष शिवसेनेला आव्हान देत असल्याची चर्चा देखील आहे. जनसन्मान रॅलीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेनेच्या जागेवर दावा ठोकत विधानसभा जिंकण्याचे आडाखे बांधायला सुरवात केली आहे. त्यात पक्षातील ही दुफळी देखील झाकून राहिली नाही. त्यामुळे ही दुफळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभेपर्यंत कशी पोचवू शकते, यावर देखील चर्चा सुरू झाल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com