Santosh Deshmukh Murder Case : 'वाँटेड' कृष्णा आंधळे..; आमदार संदीप क्षीरसागर यांची मोठी प्रतिक्रिया (पाहा VIDEO)

NCP SharadChandra Pawar MLA Sandeep Kshirsagar wanted Krishna Andhale Santosh Deshmukh murder case Beed : संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाँटेड असलेला कृष्णा आंधळे सापडत नसल्यावर आमदार संदीप क्षीरसागर यांची प्रतिक्रिया.
Sandeep Kshirsagar
Sandeep KshirsagarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाँटेड असलेला कृष्णा आंधळे अजून पोलिसांना सापडलेला नाही. तो सापडणार की नाही सापडणार, याबाबत आता शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

"मला वाटत नाही आता कृष्णा आंधळे सापडेल म्हणून. जे काही, ज्या भागात घडतं, जो काही इतिहास आहे, सापडायचा असता, तर आतापर्यंत सापडला असता. आता मला वाटत नाही सापडेल म्हणून", असे आमदार क्षीरसागर यांनी म्हटले आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटात 'मकोका'मधील आरोपी वाल्मिक कराड वर्ग करून घेतल्यानंतर त्याच्याभोवतीच 'एसआयटी' आणि 'सीआयडी'चा (CID) तपास फिरतो आहे. आता वाल्मिक कराड याची प्रकृती खालवली असल्याने त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. याशिवाय या गु्न्ह्यात वेगवेगळे पुरावे समोर येत आहेत. तपास योग्य दिशेनं चालला असला, तरी गुन्ह्यातील वाँटेड कृष्णा आंधळे अजून पोलिसांना सापडलेला नाही.

Sandeep Kshirsagar
Guardian Minister : 'योग्य वेळी योग्य ठिकाणी...'; पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीवर नाराज मंत्री मुश्रीफांचा इशारा

यावर आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) म्हणाले, "मला नाही वाटत आता कृष्णा आंधळे सापडेल म्हणून. जे काही, ज्या भागात घडतं आहे आणि इतिहास आहे, ते पाहून सापडायचा असता, तर आतापर्यंत पोलिसांना सापडला असता. आता मला वाटत नाही सापडेल म्हणून". मी पहिल्यापासून सांगत आहे, या हत्येत ज्या आरोपींचा सहभाग आहे, त्यांची 'सीडीआर' तपासा. रोज नवनवीन पुरावे समोर येत आहे. ही साखळी जुळत चालली आहे. आम्ही सांगतो, मस्साजोगचे ग्रामस्थं आणि देशमुख कुटुंबिय देखील तेच सांगत आहे, असेही आमदार क्षीरसागर यांनी म्हटले.

Sandeep Kshirsagar
Top 10 News: काँग्रेस बंडखोरांची घरवापसी? मंत्र्यांना न विचारताच एसटी भाडेवाढ- वाचा महत्वाच्या घडामोडी

माध्यमांशी हा प्रकार लावून धरला. सत्य समोर आणलं. त्यामुळे आजवर ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, ते लोक सुद्धा पुढे येत आहेत. अजून खूप जण पुढे येणार आहे. महादेव मुंडे यांच्या विषयावर सुरेश धस आणि मी पोलिस अधीक्षकांशी चर्चा केल्याचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सांगितले.

'राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चा काढला जात आहे. यावर आमदार क्षीरसागर यांनी मोर्चा काढायला कोणीच कोणाला सांगत नाही. लोकांमध्ये रोष आहे. सर्व जाती-धर्माचे लोक या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत. यात मास्टरमाईंड वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर देखील लोक रस्त्यावर उतरत आहे. त्यामुळे लोकांमध्ये किती रोष आहे, ते दिसतो आहे', याकडे आमदार क्षीरसागर यांनी लक्ष वेधले.

मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाच पाहिजे

'घटना घडल्यानंतर त्या ठिकाणच्या पोलिस अधिकाऱ्यांना कोणाचा फोन आला? हे तपासने गरजेचे आहे. प्रशासनाला देखील काम करायला मोकळा श्वास देणे गरजेचे आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. सरकारने देखील त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे', असे आमदार क्षीरसागर यांनी म्हटले.

सरेंडर झाल्यापासून वाल्मिकला व्हीआयपी ट्रीटमेंट

'वाल्मिक कराड सरेंडर झाल्यापासून त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली गेली. मुंडे मंत्रिपदावर असल्यामुळे त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात आहे. त्यामुळे त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे', अशी मागणी आमदार क्षीरसागर यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com