Guardian Minister : 'योग्य वेळी योग्य ठिकाणी...'; पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीवर नाराज मंत्री मुश्रीफांचा इशारा

DCM Ajit Pawar NCP minister Hasan Mushrif Kolhapur guardian minister Washim : कोल्हापूर जिल्हा सोडून वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री मिळालेल्या मंत्री हसन मुश्रीफांनी नाराजी व्यक्त केली आहे.
 Hasan Mushrif
Hasan Mushrif Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंत्र्यांनी पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीवर जाहीरपणे नाराजी व्यक्त करू लागले आहेत. मंत्री नरहरी झिरवळ यांना हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपदी नियुक्त केली आहे. त्यांनी गरिब जिल्हा दिला, असे म्हणत वरिष्ठांना जाब विचारणार आहे, असे म्हटले.

आता मंत्री झिरवळ यांच्यापाठोपाठ आता मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीवरून नाराजी व्यक्त केली आहे.

मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) कोल्हापूरऐवजी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर नियुक्ती मिळाली आहे. कोल्हापूरपासून वाशिम जिल्हा तब्बल 623 किलोमीटर अंतरावर आहे. मंत्री मुश्रीफ ध्वजवंदनाच्या कार्यक्रमाला वाशिम जिल्ह्यात अदल्या दिवशी म्हणजेच, 25 जानेवारीला पोचले होते. त्यावेळी त्यांनी या नियुक्तीवर काहीशी नाराजी व्यक्त केली.

 Hasan Mushrif
Beed News : मंत्र्यांसमोर युवकांचा आत्मदहनाचा प्रयत्न; एक गोरक्षक, तर दुसरा कार्यकर्ता, नेमंक काय घडलं...

पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीवर नाराजी व्यक्त करताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, "मी यावर योग्य वेळी योग्य ठिकाणी व्यक्त होणार आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी याविषयी चर्चा केली असून, श्रद्धा आणि सबुरी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे". मात्र वाशिम जिल्हाला लागलेला झेंडा-टू-झेंडा पालकमंत्री हा डाग पुसू आणि जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा दिली जाईल, असेही आश्वासन पुढे दिले.

 Hasan Mushrif
Republic Day 2025: पहिला प्रजासत्ताक दिन कुठे साजरा झाला? आता त्या ठिकाणी काय आहे?

मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याबाबत चिंता व्यक्त केली. जिल्हा लहान असला, तरी शेतीप्रधान आहे. जिल्ह्याला विकासाची गती देण्यासाठी अधिक गतीने काम गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. वाशिम जिल्ह्यातील ध्वजवंदनाचा कार्यक्रम होताच, मंत्री हसन मुश्रीफ हे तात्काळ कोल्हापूरकडे रवाना झाले. त्यांच्या दौऱ्यात कोणत्याही प्रशासकीय बैठकांचा समावेश नव्हता. त्यामुळे मंत्री मुश्रीफ पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीवर नाराज असल्याचे स्पष्ट दिसले.

पवारांच्या प्रकृतीविषयी चिंता...

दरम्यान, शरद पवार यांच्या तब्येतीविषयी मंत्री मुश्रीफ यांनी चिंता व्यक्त केली. शरद पवार यांना कफ आणि आवाज बसल्यामुळे अशक्तपणा जाणवत आहे, असे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com