Chakur Nagar Panchayat News : चाकूर नगराध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज; राष्ट्रवादीचे करीम गुळवेंच्या गळ्यात माळ पडणार!

The NCP is set to secure the chairperson post in Chakur Nagar Panchayat as only one nomination was filed, confirming an unopposed election. : नगराध्यक्ष कपिल माकणे यांच्यावर 14 नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता, बैठकीपुर्वीच माकणे यांनी राजीनामा दिला होता.
Chakur Nagar Panchayat News
Chakur Nagar Panchayat NewsSarkarnama
Published on
Updated on

Latur Political News : माजी नगराध्यक्ष कपिल माकणे यांच्यावर गेल्या मंगळवारी भ्रष्टाचार, विश्वासात न घेणे, विकास कामांकडे दुर्लक्ष अशा आरोपांमुळे सत्ताधारी आणि विरोधक अशा बहुतांश नगरसेवकांनी अविश्वास ठराव आणला होता. त्यावर सोमवारी मतदान घेण्यासाठी पिठासीन अधिकाऱ्यांनी विशेष बैठकही बोलावली. पण त्याआधीच माकणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

त्यानंतर आता नव्या नगराध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. (Latur) या पदासाठी एकमेव करीम गुळवे यांचा अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांची निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे. सोमवारी नव्या नगराध्यक्षाची निवड केली जाणार आहे. नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक करीम गुळवे यांचा एकमेव अर्ज काल दाखल झाला.

नगराध्यक्ष कपिल माकणे यांच्यावर 14 नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता, यावर विशेष बैठक होण्यापुर्वी माकणे यांनी पदाचा राजीनामा दिला होता. यामुळे रिक्त झालेल्या नगराध्यक्षपदाची सोमवारी (ता.26) निवड होणार आहे. यासाठी बुधवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) पाच, काँग्रेसचे तीन, भाजपचे तीन व प्रहार जनशक्ती पक्षाचे सहा नगरसेवक आहेत.

Chakur Nagar Panchayat News
Chakur Nagar Panchayat News : चाकूरचे नगराध्यक्ष माकणेंच्या मनमानीवर स्वपक्षीयांचाच प्रहार!

प्रहारचे नगराध्यक्ष माकणे यांच्यावर त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकांसह 14 जणांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. अविश्वास ठरावाला सामोरे जाण्यापुर्वीच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे राजीनामा सादर केला. यामुळे रिक्त झालेल्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक करीम गुळवे यांनी मुख्याधिकारी प्रतीक लंबे यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे.

Chakur Nagar Panchayat News
Latur Water Issues : लातूरच्या नेत्यांकडून उजनीच्या पाण्याचे नुसतेच राजकारण!

सोमवारी सकाळी अकरा वाजता नगराध्यक्षांची निवड होणार असून यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ. मंजूषा लटपटे यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माकणे यांचा कारभार वादग्रस्त ठरला होता. म्हणून त्यांना हटवण्याच्या हालचाली सुरू होत्या. कपिल माकणे हे भाजप-प्रहार जनशक्ती पक्ष युतीचे नगराध्यक्ष होते.

Chakur Nagar Panchayat News
Marathwada News: एका झटक्यात ग्रामस्थांनी सरपंचाला घरी बसवलं…! असं पहिल्यांदाच घडलं...

त्यांच्या राजीनाम्यानंतर आता नगर पंचायतीमध्ये पाच नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या करीम गुळवे यांच्या गळ्यात नगराध्यक्ष पदाची माळ पडणार आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी या निवडीत लक्ष घातल्याचे बोलले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com