Phulambri Assembly Constituency 2024 : भाजपला सत्ताधारी शिवसेनेकडूनच धोका, तर काँग्रेसच्या जागेवर राष्ट्रवादीचा डोळा

NCP wants Phulumbri constituency held by Congress, leaders met Sharad Pawar : पक्षांतर्ग सर्व्हेमध्ये ज्याचे नाव वरच्या क्रमांकावर असेल, त्यालाच उमेदवारी दिली जाईल, असे स्पष्ट करत बागडे यांनी सगळ्याच इच्छुकांना गॅसवर ठेवले आहे.
Ncp-Congress News Marathwada
Ncp-Congress News MarathwadaSarkarnama
Published on
Updated on

नवनाथ इधाटे

Congress-NCP Politics News : राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा मतदारसंघ असलेल्या फुलंब्रीमध्ये महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. महायुतीत ही जागा भाजपची असताना शिवसेनेने या जागेवर दावा सांगत लढण्याची तयारी सुरु केली आहे. जागा सुटली नाही, तर अपक्ष लढण्याची तयारी किशोर बंलाडे, रमेश पवार यांनी चालवली आहे. त्यामुळे भाजपकडून अधिकृत उमेदवारी जाहीर होणाऱ्या उमेदवाराची डोकेदुखी वाढणार आहे.

इकडे महायुतीत अशी परिस्थिती तर महाविकास आघाडीत काँग्रेसकडे असलेला हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडवून घ्यावा, या मागणीसाठी स्थानिक इच्छुक आणि पदाधिकाऱ्यांनी थेट बारामती गाठत शरद पवारांनाच (Sharad Pawar) साकडे घातले आहे. आता महाविकास आघाडीच्या जागा वाटपात फुलंब्रीची जागा काँग्रेस लढवणार की राष्ट्रवादी? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. हरिभाऊ बागडे राजस्थानचे राज्यपाल झाल्यानंतर फुलंब्री मतदारसंघात त्यांच्या राजकीय वारसदार कोण? यासाठी मोठी स्पर्धा लागली आहे.

पक्षांतर्ग सर्व्हेमध्ये ज्याचे नाव वरच्या क्रमांकावर असेल, त्यालाच उमेदवारी दिली जाईल, असे स्पष्ट करत बागडे यांनी सगळ्याच इच्छुकांना गॅसवर ठेवले आहे. अर्थात बागडे यांना विचारल्याशिवाय फुलंब्रीचा भाजपचा उमेदवार ठरणार नाही, हे स्पष्ट असले तरी त्यांचा आशिर्वाद कोणाला मिळतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. भाजपचा उमेदवार जाहीर होण्याआधीच शिवसेनेने बंडाची भाषा सुरू केल्याने महायुतीत तानातानी सुरू झाली आहे.

Ncp-Congress News Marathwada
Sharad Pawar: रोहित पवारांना 'टार्गेट' करणाऱ्या शिंदेंना पवारांनी भरला दम; 'उभं करायला अक्कल लागते, पण उद्ध्वस्त...'

काँग्रेसचे कल्याण काळे लोकसभेच्या जालना मतदारसंघातून निवडून गेल्यामुळे यंदा इच्छुकांची संख्या वाढली आहे. (Congress) अगदी काळे यांचे सख्खे भाऊ जगन्नाथ काळे हे देखील उमेदवारीच्या शर्यतीत आहेत. पण काळे यांनी मी कोणाचीही शिफारस करणार नाही, शिफारशीवर उमेदवारी मिळणार नाही, असे स्पष्ट करत पक्ष देईल त्याला निवडून आणावे लागेल, असे सांगून टाकले आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा स्ट्राईक रेट सर्वाधिक राहिल्याने विधानसभेच्या अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्याचा राज्यातील नेत्यांचा प्रयत्न आहे.

अशावेळी फुलंब्रीत मात्र काँग्रेसच्या या जागेवर राष्ट्रवादीने दावा सांगितला आहे. फुलंब्रीतील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नुकतीच बारामतीत शरद पवारांची भेट घेत त्यांना जागा सोडवून घालण्यासाठी साकडे घातले. या मतदारसंघात 2014 आणि 2019 या दोन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभव पत्करावा लागला.

Ncp-Congress News Marathwada
Bacchu Kadu On Congress: '...तर काँग्रेसचं डिपॉझिट जप्त झालं असतं!'; बच्चू कडू काँग्रेसवर घसरले

आता भाकरी फिरवा आणि राष्ट्रवादीकडे हा मतदारसंघ घ्या, अशी मागणी शरद पवारांच्या भेटीत करण्यात आली. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष द्वारकाभाऊ पाथ्रीकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाथ्रीकर, शहराध्यक्ष अजहर पटेल,राष्ट्रवादी युवकचे भरत काकडे आदींच्या शिष्टमंडळाने शरद पवारांची भेट घेत हा मतदारसंघ आपण कसा जिंकू शकतो? हे पटवून सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com