Sharad Pawar: रोहित पवारांना 'टार्गेट' करणाऱ्या शिंदेंना पवारांनी भरला दम; 'उभं करायला अक्कल लागते, पण उद्ध्वस्त...'

Sharad Pawar On Ram Shinde : रोहित पवारांनी कर्जत- जामखेड मतदारसंघात एमआयडीसी आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये अनेकांनी अडथळे आणण्याचे काम केले. खरंतर एमआयडीसी होतेय म्हटल्यावर जुन्या लोकप्रतिनिधीला आनंद व्हायला पाहिजे होता.
Sharad pawar rohit pawar ram shinde.jpg
Sharad pawar rohit pawar ram shinde.jpgSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : विधानसभेच्या निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या आहेत तसा मतदारसंघातला संघर्ष टोकदार होऊ लागला आहे.याचाच प्रत्यय कर्जत-जामखेड मतदारसंघातही दिसून येत आहे.2019 च्या विधानसभेला भाजपच्या राम शिंदेंचा पराभव करत रोहित पवारांनी वर्षानुवर्ष बालेकिल्ला राहिलेला कर्जत-जामखेड खेचून आणलं.

तेव्हापासून या दोन्ही नेत्यांमध्ये कुरघोडीचं- आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू आहे.त्यात महायुती सरकार सत्तेत आल्यावर आणि विधान परिषदेची आमदारकी मिळवल्यानंतर राम शिंदेंनी रोहित पवारांना अनेकदा घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावरुनच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राम शिंदेंना दम भरला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथे ज्येष्ठ नेते शरद पवार शनिवारी (ता.28) बोलत होते.यावेळी त्यांनी भाजप आमदार राम शिंदेंवर शा‍ब्दिक हल्ला चढवला.ते म्हणाले,रोहित पवार या मतदारसंघात चांगले काम करत आहे. त्याला मदत करता आली नाही तर त्याच्या कामात खोडा घालू नका. उभं करायला अक्कल लागते. पण उभं केलेलं उद्ध्वस्त करायला अक्कल लागत नाही असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

पवार म्हणाले, रोहित पवारांनी कर्जत- जामखेड मतदारसंघात एमआयडीसी आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये अनेकांनी अडथळे आणण्याचे काम केले. खरंतर एमआयडीसी होतेय म्हटल्यावर जुन्या लोकप्रतिनिधीला आनंद व्हायला पाहिजे होता.याचं कारण म्हणजे एमआयडीसीमुळे अनेकांच्या हाताला काम मिळणार आहे.एमआयडीसीला विरोध करणे,त्यात अडचणी आण्याचे काम सुरु आहे, असा आरोपही खासदार शरद पवारांनी यावेळी केला.

Sharad pawar rohit pawar ram shinde.jpg
Prakash Ambedkar : उद्धव ठाकरेंना फक्त 44 जागा मिळणार, प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

यावेळी रोहित पवारांना पुन्हा एकदा साथ देण्याची दोन महिन्यांनी राज्यातील चित्र बदलणार आहे. मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात असल्याचं आपण रोहित पवारांना सांगितल्याचेही शरद पवार यावेळी म्हणाले. त्यांनी रोहित यांनी कारखाने वेगवेगळ्या ठिकाणी असल्याचा विचार करुनच दोन तालुक्यांच्या मध्यभागी एमआयडीसी आणण्यासाठी प्रयत्न केले.पण त्यात अडथळा आणण्याचं काम झालं.

राज्यातील सर्व जिल्हे विकासाकडे वाटचाल करतील.येत्या 2 महिन्यांत चित्र बदलणार आहे.पण त्यासाठी मला तरुणांची साथ हवी आहे. ही ताकद कुणात असेल तर ती रोहित पवारांमध्ये आहे. त्यामुळं त्यांना साथ देण्याचं आवाहन शरद पवारांनी खर्डा येथे उपस्थितांना केलं.

Sharad pawar rohit pawar ram shinde.jpg
Ahmednagar Politics : खासदार लंके उखाण्यात कोणाचं नाव घेणार? पाटील 'एबी' फॉर्मवर सही करणार

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अहमदनगर येथील जामखेड तालुक्यातील कुसडगावमध्ये असणाऱ्या एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्राचे, पोलिसांच्या विरोधानंतरही उद्घटान केले. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. शिवाय, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमवीर त्यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघाबाबतही ते बोलले आहेत.

रोहित पवार म्हणाले, 'मी कर्जत-जामखेड ऐवजी कुठल्याही मतदारसंघात उभा राहिलो असतो. पण लोकसभा निवडणुकीच्या काळात मी कर्जत-जामखेडमध्ये फिरायचो तेव्हा मला असं वाटायचं ही लोक माझीच आहे. त्यावेळी पवारसाहेबांनी विचारले तेंव्हा मी त्यांना सांगितले मी कर्जत-जामखेडमधूनच विधानसभा निवडणुक लढवणार. पवार साहेबांनी सांगितले की तू तिथे आमदार झाल्यावरही तुझ्या स्वभावात बदल होऊ देऊ नकोस, तेच मी करत आहे. कोरोना काळात मी प्रत्येकाची घरातील व्यक्तीप्रमाणे सेवा केली असल्याचंही आमदार रोहित पवारांनी बोलून दाखवलं.

Sharad pawar rohit pawar ram shinde.jpg
Mahayuti News : एका रात्रीत तिकीट मिळवणाऱ्या जानकरांना महायुती आता चर्चेलाही बोलवेना!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com