Bacchu Kadu On Congress: '...तर काँग्रेसचं डिपॉझिट जप्त झालं असतं!'; बच्चू कडू काँग्रेसवर घसरले

Parivartan Mahashakti Political News : महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीकडून संधी चुकलेले अनेक उमेदवार तिसऱ्या आघाडीला आयतेच मिळण्याची चिन्हे आहेत.
bacchu kadu
bacchu kadusarkarnama
Published on
Updated on

Amravati News : काही दिवसांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीसह सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. तसेच युती आणि आघाडीशी वाजलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना,स्वराज्य संघटना यांच्यासह काही पक्षांकडून तिसऱ्या आघाडीची जोरदार जमवाजमव सुरू आहे.

या आघाडीला परिवर्तन महाशक्ती असं नाव देण्यात आलं आहे. या आघाडीत दाखल झालेले प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी महाविकास आघाडी आणि महायुतीवर जोरदार हल्लाबोल सुरू केला आहे. त्यातच ते काँग्रेसवर तोंडसुख घेण्यात आघाडीवर आहे.

प्रहार शेतकरी संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू अमरावतीत मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेससह (Congress) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षावर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले,लोकसभा निवडणुकीत जर मुस्लिम अन् दलित समाजाची मतं मिळाली नसती तर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचं डिपॉझिट जप्त झालं असतं असा खळबळजनक दावा केला आहे.

बच्चू कडू म्हणाले, सगळे राजकीय पक्ष वाढले पाहिजेत. कारण दुकानदारी वाढली की, उधार घ्यायला बरं होतं.गावात एकच दुकान राहिले तर मक्तेदारी वाढते. दहा दुकानं झाली की दुकान चालते, जो चांगलं देईल, त्याची दुकानदारी चालेल असं विधान करत कडूंनी अप्रत्यक्ष कुणावर निशाणा साधला याची चर्चा विदर्भासह महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे.

bacchu kadu
Anil Kadam Politics: उद्धव ठाकरेंनी अनिल कदम यांच्या मर्मावरच बोट ठेवले, उमेदवारीत भाऊबंदकीचा अडसर?

आमदार बच्चू कडू यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतला मोठा पक्ष ठरत काँग्रेसनं तब्बल 14 जागा जिंकल्या होत्या. 2019 च्या निवडणुकीत महाराष्ट्रात अवघी 1 जागा जिंकलेल्या काँग्रेससाठी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतलं यश म्हणजे छप्पर फाडके असंच बोलले जात आहे.

यातच बच्चू कडूंनी काँग्रेसला मिळालेल्या यशामागं दलित आणि मुस्लिम मतदार असल्याचं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी जर मुस्लिम अन् दलित समाजाची मतं मिळाली नसती तर काँग्रेसचं डिपॉझिट जप्त झालं असतं असं विधान केलं आहे.

bacchu kadu
Ajit Pawar Politics: अजित पवार संतापले, म्हणाले, उमेदवारीसाठी येताय "No Entry"

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावरही घणाघात केला. ते म्हणाले, आम्ही उभं राहिल्यानं तुमचं नुकसान होत असेल तर तुमची कुवत काय हे माहिती पडते. जयंत पाटलांनी महाविकास आघाडीची मतं फोडण्यासाठी तिसऱ्या आघाडीमार्फत प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर कडूंनी दिली आहे.

तिसऱ्या आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वराज्य या पक्षांसह प्रहारचा समावेश असेल. ही आघाडी राज्यभर प्रभावी ठरेल का? याबाबत चर्चा आहे. तिसऱ्या आघाडीकडून निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा करण्यास सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीकडून संधी चुकलेले अनेक उमेदवार तिसऱ्या आघाडीला आयतेच मिळण्याची चिन्हे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com