Beed News : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या डॉक्टर कन्येचा नगर पंचायतीनंतर आता गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीतही सरपंचपदावर पराभव झाला. Grampanchayat Election पत्रकार संतोष सोनवणे यांच्या पत्नी व काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष राहूल सोनवणे यांच्या भावजय प्रविणा सोनवणे यांनी त्यांना मात दिली.
ग्रामपंचायतीचे उपसरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य असलेल्या बजरंग सोनवणे व त्यांच्या पत्नी मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीत एकाच वेळी विजयी झाल्या. (Ncp) येडेश्वरी कारखान्याचे अध्यक्ष असलेल्या बजरंग सोनवणे यांचा केज मतदार संघात मोठा संपर्क आहे. (Beed News) त्यामुळे पक्षाने त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद आणि लोकसभेची उमेदवारीही दिली होती.
मात्र, त्यांना मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला. दरम्यान, जानेवारी महिन्यात झालेल्या नगर पंचायत निवडणुकीत बजरंग सोनवणे यांनी वैद्यकीय पदवीचे शिक्षण घेणाऱ्या कन्या डॉ. हर्षदा यांना निवडणुक रिंगणात उतरविले होते. त्यावेळी बजरंग सोनवणे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते. त्या निवडणुकीत डॉ. हर्षदांना पराभवाचे तोंड पहावे लागले.
तर, आता ग्रामपंचायत निवडणुकीतही बजरंग सोनवणे यांनी कन्या हर्षदा यांना सारणी (ता. केज) या गावच्या ग्रामपंचायतीत सरपंचपदावर उमेदवार म्हणून उभे केले. ग्रामपंचायतीवर अनेक वर्षे बजरंग सोनवणे यांचीच सत्ता आणि परिसरातच त्यांचा येडेश्वरी साखर कारखाना देखील आहे. त्यामुळे हमखास विजय मिळेल, असा त्यांना विश्वास असावा.
दरम्यान, समोरुन काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राहूल सोनवणे यांच्या आघाडीकडून पत्रकार संतोष सोनवणे यांच्या पत्नी सरपंचपदाच्या उमेदवार होत्या. निवडणुकीत प्रविणा सोनवणे यांनी डॉ. हर्षदा सोनवणे यांना ११० मतांनी मात दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.