नांदेड : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे (NCP) माजी आमदार तसेच राष्ट्रवादी किसान सेलचे प्रदेशाध्यक्ष शंकरअण्णा धोंडगे यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) यांची भेट घेतल. त्यामुळे भविष्यात ते राव यांच्या 'भारत राष्ट्र समिती’त जाणार का, असा प्रश्न विचारला असता धोंडगे यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले. (NCP's senior leader Shankaranna Dhondge Meet K. Chandrasekhar Rao)
राज्य सरकारच्या अर्थसंकल्पावर ते बोलत होते. त्यावेळी त्यांना टीआरएसमध्ये प्रवेश करण्याबाबत प्रश्न विचारला होता. ते म्हणाले की, तेलंगणाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी प्रतिवर्षी प्रतीएकरी दहा हजार रुपयांची थेट मदत करावी. शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांच्या मदतीची अर्थसंकल्पात केलेली घोषणा ही भविष्यात भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) महाष्ट्रातील विस्ताराच्या भीतीने केल्याचा आरोपही त्यांनी केला.
राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी केलेल्या घोषणा थातूरमातूर आहेत. सरकारच्या उदासीन धोरणामुळे कापूस, सोयाबीन व कांद्यासह इतर पिकांचे भाव निचांकी पातळीवर गेले आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहे. अशा स्थितीत आपल्याकडील शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी तेलंगणातील काही योजन राबविण्याची गरज आहे.
तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांनी तेथील शेतकऱ्यांसाठी दहा हजारांची मदत, शेतीसाठी मोफत व पूर्ण वेळ वीजपुरवठा, शेती सिंचनासाठी शून्य पाणीपट्टी यासह अन्य काही योजना राबविल्या आहेत. त्यातून शेती व्यवसायाला आधार दिला आहे. त्यांनी नांदेडमध्ये येऊन नुकताच मेळाळा घेतला. त्यात ‘अब की बार किसान सरकार’ ही घोषणा केली. त्यामुळेच राज्य सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी सहा हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली, असे धोंडगे म्हणाले.
राष्ट्रवादी किसान सेलचे प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेतली. भविष्यात राव यांच्यासोबत जाणार का, असा प्रश्न चिारण्यात आला होता. त्यावर थेट उत्तर देण्याचे त्यांनी टाळले होते. तेलंगण राज्याच्या ‘रयतू बंधु’ (शेतकरी बंधू) या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातही अशी योजना राबवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी सरकारकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.