Latur Politics : देशमुख-निलंगेकर मैत्रीचा नवा अध्याय; ‘आम्ही एकत्र यायचे नाही, तर हातात काठ्या घेऊन एकमेकांचा विरोध करायचा का?’

Deshmukh-Nilangekar Together : मी विरोधी पक्षात आहे; म्हणून सध्या थंड झालो आहेच. पण, भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे सत्ताधारी पक्षात असूनही थंड आहेत, अशी कोटी करीत अमित देशमुख यांनी संभाजी पाटील निलंगेकर यांना मंत्रिपद न मिळाल्याच्या घटनेवर भाष्य केले.
Amit Deshmukh- Sambhaji Patil-Nilangekar
Amit Deshmukh- Sambhaji Patil-NilangekarSarkarnama
Published on
Updated on

सुशांत सांगवे

Latur, 27 December : मी विरोधी पक्षात असल्याने सध्या थंड आहे. पण, भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे सत्ताधारी पक्षात असूनही (मंत्रीपद न मिळाल्याने) थंड आहेत. ते थंड असल्यामुळेच आमचे एकमेकांचे आता अधिक जमत आहे. आतातर आमच्यात जमायला सुरवात झाली आहे, त्यामुळे आमच्यातील संबंध अनेकांसाठी ‘देखते रह जाओगे’ असेच राहतील, असे विधान काँग्रेसचे नेते, आमदार अमित देशमुख यांनी केले.

लातूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे आयोजित ‘लातूर क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पो’चे उद्‌घाटन खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh), आमदार संभाजी पाटील-निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, अभिनेत्री प्राजक्ता माळी आदीच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. 26 डिसेंबर) झाले.

लातूर जिल्ह्याच्या विकास हेच सूत्र समोर ठेवून आम्ही एकत्र आलो आहोत, असे आमदार अमित देशमुख, आमदार संभाजी पाटील-निलंगेकर (Sambhaji Patil-Nilangekar) यांनी प्रथमच जाहीर मंचावर येऊन सांगितले. त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये मैत्रीचा नवा अध्याय सुरू झाला आहे, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

Amit Deshmukh- Sambhaji Patil-Nilangekar
Manmohan Singh : डॉ. मनमोहन सिंग यांना भारतरत्न देण्याची आम आदमी पक्षाची मागणी

मी विरोधी पक्षात आहे; म्हणून सध्या थंड झालो आहेच. पण, भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे सत्ताधारी पक्षात असूनही थंड आहेत, अशी कोटी करीत अमित देशमुख यांनी संभाजी पाटील निलंगेकर यांना मंत्रिपद न मिळाल्याच्या घटनेवर भाष्य केले. ते थंड आहेत म्हणून आता आमच्यात जमायला सुरवात झाली आहे. आम्ही किती जमवून घेणार, हे ‘देखते रह जाओगे तुम...' अशी स्थिती राहील... असे भाष्यही अमित देशमुख यांनी केले.

संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, लातुरातून अमित देशमुख हे आमदार होऊ नयेत म्हणून; आम्ही आटोकाट प्रयत्न केले आणि निलंग्यातून मी आमदार होऊ नये म्हणून अमित देशमुख यांनी पूर्ण प्रयत्न केले. निवडणुकीत अनेक तंत्र वापरली गेली. पण, निवडणूक संपली असून आता आम्ही विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आहोत. पण, आमचे एकत्र येणे, इतकेच काय आम्ही एकमेकांना नमस्कार करणे हेही काहींना आवडत नाही.

Amit Deshmukh- Sambhaji Patil-Nilangekar
Mahayuti : महायुतीचे सरकार येऊन महिना होत नाही तोच दोन पक्षांत महापौरपदावरून खडाखडी...

आम्ही एकत्र यायचे नाही, तर हातात काठ्या घेऊन एकमेकांचा विरोध करायचा का? शेजारच्या बीड जिल्ह्यात काय घडते आहे, हे आपण पाहत आहोत. असे लातूरात घडणार नाही. लातूरात सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे. विकासासाठी एकत्र येणारे लातुरातील सत्ताधारी, विरोधी पक्षातील आमदार, हा लातूर पॅटर्न राज्यात सर्वत्र पोचायला हवा.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com