Mahayuti : महायुतीचे सरकार येऊन महिना होत नाही तोच दोन पक्षांत महापौरपदावरून खडाखडी...

Raosaheb Danve Vs Arjun Khotkar : भाजप कार्यकर्त्यांसमोर बोलताना माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांनी ‘जालन्याचा महापौर भाजपचा होईल’, असा दावा केला होता. त्यानंतर शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांनीही जालन्यात शिवसेनेचाच महापौर बसेल असे म्हटले आहे. त्यामुळे जालन्याच्या महापौरपदावरून महायुतीमध्ये खडाखडा सुरू झाली आहे.
Raosaheb Danve-Arjun Khotkar
Raosaheb Danve-Arjun KhotkarSarkarnama
Published on
Updated on

Jalna, 26 December : महायुतीचे सरकार येऊन महिना होत नाही, तोच तीन पक्षांमध्ये कुरबुरीला सुरुवात झाली आहे. त्याची पहिली ठिणगी मराठवाड्यात पडण्याची शक्यता असून जालन्याच्या महापौरपदावरून शिवसेना आणि भाजपचे वरिष्ठ नेते, पारंपारिक विरोधक माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि माजी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे हे पुन्हा एकदा आमने सामने उभे ठाकले आहेत.

भाजप कार्यकर्त्यांच्या समोर बोलताना माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील (Raosaheb Danve Patil) यांनी ‘जालन्याचा महापौर भाजपचा होईल’, असा दावा केला होता. त्यानंतर शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांनीही जालन्यात शिवसेनेचाच महापौर बसेल असे म्हटले आहे. त्यामुळे जालन्याच्या महापौरपदावरून निवडणुकीच्या अगोदरच महायुतीमध्ये खडाखडा सुरू झाली आहे.

यासंदर्भात दानवे म्हणाले, महापालिका निवडणुकीत महायुतीमधील मित्रपक्षांशी चर्चा करून जागा वाटपासंदर्भात निर्णय घेतला जाईल. भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत जालन्याचा (Jalna) महापौर हा भाजपचा होईल, असे मी बोललो आहे. कार्यकर्त्यांच्या बैठकीत भाजपचा महापौर होणार नाही, असे मी थोडंच म्हणणार आहे, त्यामुळे जालन्यात भाजपचाच महापौर होईल. पक्षसंघटनेत काम करत असताना मित्रपक्षाशी एकत्र येण्याची आमची पहिल्यापासूनची प्रथा आहे.

Raosaheb Danve-Arjun Khotkar
Prashant Paricharak : प्रशांत परिचारक विधीमंडळात कधी दिसणार?; बावनकुळेंनी पंढरपुरात येऊन दिलेला शब्द भाजप पाळणार का?

स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीसंदर्भात नेतेमंडळी जे निर्णय वर करतील, त्या प्रमाणे खालचे स्थानिक पातळीवरील निर्णय होतील, असेही रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले. दानवे यांनी भाजप कार्यकर्त्यांसमोर केलेल्या दाव्याला खोतकर यांनी प्रतिआव्हान दिले आहे.

अर्जून खोतकर म्हणाले, केंद्रात, राज्यात आपले सरकार आहे, त्यामुळे शिवसेनेच्या विचाराची महापालिका दिली तर कामाला प्रचंड गती येणार आहे. दुर्दैवाने तसं झालं नाही तर विकासाला खीळ बसेल. महापालिकेत आमचीच सत्ता आली तर केंद्र आणि राज्याचा निधी आणून शहरात सर्वोत्तम काम करण्याची संधी आम्हाला आहे. मतदारांनी आम्हाला एक संधी दिली तर संपूर्ण शहर बदलून दाखवेन.

Raosaheb Danve-Arjun Khotkar
Pratap Sarnaik-Video : प्रताप सरनाईकांनी आपला शब्द खरा केला; पनवेल-खोपोली एसटीने प्रवास केला!

महापालिका निवडणुकीची तयारी आम्ही पक्षीय पातळीवर संघनात्मक पद्धतीने सुरू आहे. जालना महापालिकेवर मी शिवसेनेचाच महापौर बसवणार आहे. कारण जालन्यातील एक लाख पाच हजार जनतेने मला मतदान केले आहे, त्यामुळे आमच्यावर लोकांचा विश्वास असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या माध्यमातून निधी खेचून आणण्याची ताकद आपल्यात आहे, हे जनतेला माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com