Ashok Patil Nilangekar News : जॅकेट अन् टोपी घालून कोणी वारस ठरत नाही, मीच निलंगेकरांचे खरा राजकीय वारस..

Congress : घोडामैदान दुर नाही मतदारच विरोधकांना त्यांची जागा दाखवतील.
Mla Sambhaji Patil- Ashok Patil Nilangekar News, Latur
Mla Sambhaji Patil- Ashok Patil Nilangekar News, LaturSarkarnama
Published on
Updated on

Latur Political : काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकरांचा (Shivajirao Patil Nilangekar) खरा राजकीय वारस मीच असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर यांनी केला. भाजपाचे माजीमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर या निमित्ताने त्यांनी निशाणा साधाला. बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Mla Sambhaji Patil- Ashok Patil Nilangekar News, Latur
Pankaja Munde On GST Raid : अचानक जीएसटीची धाड पडल्याने पंकजा मुंडे आश्चर्यचकित..

सध्या निलंगा, औरादशहाजानी व देवणी येथील बाजार समितीच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. अद्याप निवडणूकीचे चित्र स्पष्ट झाले नसून महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटणार आहे. महाविकास आघाडीचा अंतिम निर्णय लवकरच जाहीर केला जाईल. (Congress) सध्या भाजपाकडूनही निलंगा, औरादशहाजानी व देवणी बाजार समितीची निवडणूक लढवली जात असून लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका जाहीर होणार आहेत.

घोडामैदान दुर नाही मतदारच विरोधकांना त्यांची जागा दाखवतील. केवळ जॅकेट अन् टोपी वापरून राजकीय वारस होता येत नाही, असा टोला देखील निलंगेकर यांनी संभाजी पाटील (Sambhaji Patil Nilangekar) यांना अप्रत्यक्षरित्या लगावला. बहूतांश विविध कार्यकारी सोसायटी व ग्रामपंचायती काँग्रेस पक्षाच्या विचारांच्या ताब्यात असून या तिन्ही बाजार समित्यावर महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) झेंडा फडकावणार असल्याचा दावा त्यांनी केला.

विरोधकांनी लोकशाही पध्दतीने तत्वाचे राजकारण करावे आता काळ बदलला आहे. जनता कोणाच्याही दबावाला भिक घालणार नाही, असा इशारा देत शासनाने आता शेतकऱ्यांनाही या निवडणूकीत उमेदवारीचा अधिकार दिल्यामुळे निवडणूकीत चुरस निर्माण झाल्याचे ते म्हणाले. निलंगा बाजार समितीवर भाजपा कार्यकर्ते प्रशासक म्हणून होते त्यांच्या ताब्यात निलंगा बाजार समिती असताना अतिशय बिकट अवस्था केली होती. ही संस्था डबघाईला आणण्याचे काम भाजप प्रणीत प्रशासकाने केला असा, आरोपही त्यांनी यावेळी केला.

या बाजार समितीचा प्लान अधिकृत नसल्यामुळे मुलभूत सुविधा पुरवण्यास अडचणी निर्माण होत होत्या. त्या अधिकृत करून पूर्णत्वाकडे घेऊन जाण्याचे काम आम्ही केले, असेही त्यांनी यावेळी सांगितले. कोण काम करतो, कोण सुविधा पुरवतो याची जाणीव बाजार समितीच्या मतदारांना आहे. त्यामुळे सत्ता कोणाच्या ताब्यात द्यायची हे मतदार ठरवरणार आहेत. शिवाय निवडणूक काळात अनेक अपप्रचार करून मतदारामध्ये संभ्रम निर्माण होईलच, त्यामुळे मतदारही जागृक राहून मतदान करतील, असा विश्वास अशोक पाटील यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com