अब्दुल सत्तार यांना मीच काय, कुणीच गांभीर्याने घेत नाही..

मतदार संघातील काही काम काढून घेण्यासाठी सत्तार यांनी युती संदर्भातील ते विधान केले असावे. गडकरींना खूष करण्याचा सत्तार यांचा प्रयत्न असला तरी गडकरी हुशार आहेत. (Raosaheb Danve)
Raosaheb Danve-Abdul Sattar

Raosaheb Danve-Abdul Sattar

Sarkarnama

नवी दिल्ली : दिल्ली दौऱ्यावर जाऊन महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप युती संदर्भात परस्पर विधान करून खळबळ उडवून देणारे शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आता मात्र टीकेचे धनी होत आहेत. विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांनी सत्तार यांच्या या विधानाचा समाचार घेतल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील सत्तार यांना सबुरीचा सल्ला देत त्यांचे कान टोचले आहेत. दरम्यान, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी देखील सत्तार यांना मीच काय पण कुणीच गांभीर्याने घेत नाही, असा टोला लगावला आहे.

अब्दुल सत्तार गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत आहेत. काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतल्यानंतर आज त्यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची त्यांच्या बंगल्यात जाऊन गळाभेट घेतली. आधीच नितीन गडकरींनी पुढाकार घेतला तर शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येऊ शकतात हे विधान करत सत्तार यांनी वाद ओढावून घेतला, त्यात आज त्यांनी पुन्हा दानवेंची भेट घेऊन या वादाला हवा देण्याचा प्रयत्न केला.

पण राजकारणात विरोधकांना चकवा देण्यात माहीर असलेल्या दानवेंनी सत्तार यांनाही चकवा दिला. सत्तार यांची पाठ फिरताच प्रसार माध्यमांशी बोलतांना दानवे यांनी सत्तार यांच्या त्या विधाना संदर्भात प्रतिक्रिया देतांना ` मी सत्तार यांना गांभीर्याने घेत नाही, मीच काय पण कुणीच त्यांना गांभीर्याने घेत नाही, असे म्हणत टोला लगावला.

<div class="paragraphs"><p>Raosaheb Danve-Abdul Sattar</p></div>
`नया है वह`, फडणवीसांनी उडवली अब्दुल सत्तारांची खिल्ली..

नितीन गडकरी यांना उद्देशून केलेल्या विधानामागे देखील सत्तार यांचे काही विशेष कारण असेल. मतदार संघातील काही काम काढून घेण्यासाठी सत्तार यांनी युती संदर्भातील ते विधान केले असावे. गडकरींना खूष करण्याचा सत्तार यांचा प्रयत्न असला तरी गडकरी हुशार आहेत, असंही दानवे म्हणाले. तत्पुर्वी भाजपचे राज्यातील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील नया है वह, असा उल्लेख करत सत्तार यांच्या युती संदर्भातील वक्त्तव्याची खिल्ली उडवली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com