Jalna Maratha Protest : डेडलाइन संपल्यावर एकाही राजकीय नेत्याला अंतरवालीत येऊ देणार नाही...

Marathwada News : उपोषण अथवा साखळी उपोषण चालू आहे, त्या ठिकाणी मी व माझे सहकारी आता भेट देतील.
Jalna Maratha Protest News
Jalna Maratha Protest NewsSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीत सतरा दिवस उपोषण केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला तीस दिवसांचा वेळ दिला आहे. ही डेडलाइन १४ आक्टोबर रोजी संपत आहे. (Manoj Jarange Patil News) याच दिवशी शासनाच्या आदेशाची वाट पाहणे व पुढील नियोजन करणे यासाठी राजस्तरीय सभेचे नियोजन करण्यात येत आहे. अंतरवाली सराटी येथे उपोषणस्थळी मनोज जरांगे यांनी या संदर्भात आज नियोजन मेळावा घेतला.

Jalna Maratha Protest News
Latur BJP Political : रेल्वेने पाणी आणण्याची वेळ येऊ नये; `जलसाक्षरता` मोहीम यशस्वी करा...

गोदाकाठावरील १४२ गावांतील मराठा समाज बांधवांच्या साक्षीने हा नियोजन मेळावा पार पडला. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) इथे आमरण व साखळी उपोषण होत आहे. शासनाने तीस दिवसांची मुदत मागतली ती मुदत दिली व आमरण उपोषण थांबवले. पण साखळी उपोषण सुरूच आहे. (Jalna) शासनाला जी मुदत दिली ती १४ आक्टोबर रोजी संपत आहे. या दिवशी शासन काय निर्णय घेते हे पाहून अंतरवाली सराटी परिसरात भव्य सभेचे नियोजन करण्यात येत आहे.

या सभेसाठी योग्य जागेचा शोध सुरू असून, राज्यभरातील मराठा बांधवांना बोलावून ही सभा घेणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. (Marathwada) या सभेत तीस दिवसांनंंतर शासनाने काय निर्णय घेतले, कोणते जीआर आले, शासनाची पुढील दिशा काय असणार? व पुढे काय निर्णय घ्यायचा? हे ठरवण्यासाठी हा मेळावा आहे. आज जे ठरेल त्याची संपूर्ण माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे.

तीस दिवसांनंतर शासनाकडून मध्यस्थी करण्यासाठी जे कोणी येतील, त्यांना बंदी घालण्यात येणार असल्याचेही जरांगे यांनी या वेळी स्पष्ट केले. कोणालाही ( लोकप्रतिनिधी/शासकीय अधिकारी) अंतरवाली येथे सभास्थानीही येऊ दिले जाणार नाही, त्यांना बंदी घातली जाईल, असे जरांगे पाटील यांनी सांगितले. आरक्षण देण्यासाठी शासनाला ३० दिवसांचा वेळ व १० दिवस शिल्लक दिले आहेत.

त्यामुळे त्यांनी लवकर निर्णय घेऊन आरक्षण द्यावे, राज्यात सध्या ज्या-ज्या ठिकाणी उपोषण अथवा साखळी उपोषण चालू आहे, त्या ठिकाणी मी व माझे सहकारी आता भेट देतील. त्या गावांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल, असेही जरांगे यांनी नियोजन मेळाव्यात सांगितले. शनिवारी अंतरवाली सराटी येथे साखळी उपोषणस्थळी रेणापुरी व नालेवाडी या गावांतील नागरिकांनी जागर केला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com