Pratap Patil Chikhlikar Met Jarange Patil : लोकसभेतील पराभवाची पुनरावृत्ती नको, चिखलीकर जरांगे पाटलांच्या भेटीला

Not to repeat the defeat of the Lok Sabha elections, Pratap Patil Chikhlikar met Jarange Patil : राज्यातील अनेक नेते त्यांच्या प्रकृतीच्या चौकशीसाठी त्यांना भेटायला येत आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रताप पाटील चिखलीकर यांनी पहिल्यांदाच जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांना पुष्पगुच्छ दिला.
Pratap Patil Chikhlikar News
Pratap Patil Chikhlikar NewsSarkarnama
Published on
Updated on

Nanded BJP Politics News : लोकसभा निवडणुकीच्या निकालाने भल्याभल्या नेत्यांना जमीनीवर आणले. मराठवाड्यात जरांगे फॅक्टर असा काही चालला, की त्यात महायुतीच्या बहुतांश उमेदवार गारद झाले. माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, सुधाकर शृंगारे आणि नांदेडचे प्रताप पाटील चिखलीकर यांचा त्यात समावेश होता. अशोक चव्हाण यांच्यासारखा मातब्बर चेहला लोकसभेआधी भाजपमध्ये आला, तरी चिखलीकर यांना पराभवाचे तोंड पहावे लागले.

लोकसभेत झालेल्या पराभवाची पुनरावृत्ती आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा नको? असे म्हणत माजी खासदार आणि लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरू पाहणारे प्रताप पाटील चिखलीकर (Prataprao Patil Chikhlikar) यांनी नुकतीच मराठ आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत सुरु केलेले आपले सहावे उपोषण मागे घेतल्यानंतर ते छत्रपती संभाजीनगरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

राज्यातील अनेक नेते त्यांच्या प्रकृतीच्या चौकशीसाठी त्यांना भेटायला येत आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रताप पाटील चिखलीकर यांनी पहिल्यांदाच जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांना पुष्पगुच्छ दिला. प्रकृतीची चौकशी करतानाच इतर विषयावर या दोघांमध्ये जाहीर चर्चाही झाली. लोकसभेच्या नांदेड मतदारंसघात काँग्रेस महाआघाडीच्या वसंतराव चव्हाण यांच्याकडून महायुतीचे प्रताप पाटील चिखलीकर 60 हजार मतांनी पराभूत झाले होते.

Pratap Patil Chikhlikar News
Pratap Chikhlikar News : लोकसभेतील पराभवानंतर आता प्रतापराव चिखलीकर पुन्हा निवडणूक लढवणार; मतदारसंघही ठरला !

खासदार झाल्यानंतर अडीच महिन्यांनीच वसंत चव्हाण यांचे निधन झाले. लोकसभेची पोटनिवडणुक विधानसभेसोबतच होण्याची शक्यता आहे. वसंतराव चव्हाण यांच्या मुलाला काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाणार आहे. (Manoj Jarange Patil) राज्यात अजूनही महायुतीच्या विरोधातील वातावरण शांत झालेले नाही, अशातच काँग्रेसने वसंतराव चव्हाण यांच्या मुलाला उमेदवारी दिली, तर सहानुभूतीचा फायदा होऊन ते सहज विजयी होतील, असा अंदाज आहे.

अशावेळी दुसऱ्यांदा पोटनिवडणुकीत उमेदवारी घेऊन जोखीम पत्करण्यापेक्षा चिखलीकर यांनी लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातून लढण्याची तयारी सुरू केली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची आपल्यावर कृपा दृष्टी राहावी, यासाठीच चिखलीकरांनी त्यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या भेटीचा चिखलीकर यांना लोहा-कंधार मध्ये किती फायदा होतो ? हे लवकरच स्पष्ट होईल.

Pratap Patil Chikhlikar News
Manoj Jarane : 'या' एका शब्दानं सरकारची तंतरली; मनोज जरांगेंनी सांगितला किस्सा

दरम्यान, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या न्याय हक्काची लढाई लढत आहेत. हा लढा लढत असताना त्यांची प्रकृती खालावली, त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे ऍडमिट करण्यात आले. त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आपण आलो असल्याचे चिखलीकर यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com