आता बीड पालिकेतील सर्वच जागा जिंकणार; आमदार क्षीरसागरांचा दगाबाजांना इशारा

Sandeep Kshirsagar |Beed : अनेक नगरसेवकांनी आमदार संदिप क्षीरसागरांची साथ सोडली आहे.
Sandeep Kshirsagar Latest News
Sandeep Kshirsagar Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

Sandeep Kshirsagar : नगर परिषद निवडणुकीसाठी 40 दिवसांच्या नियोजनाचा आराखडा तयार केला आहे. या नियोजनातून बीड (Beed) पालिकेतील सर्वच ५२ नगरसेवक राष्ट्रवादीचे (NCP) निवडुण येतील, असा विश्वास आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी व्यक्त केला. तसेच वेळ सापडुन दगा देणार्‍या आणि खोटे आश्वासन देवून भूमिका बदलणार्‍या आणि मी म्हणणाऱ्यांना आगामी पालिका निवडणुकीतून उत्तर देणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. (Sandeep Kshirsagar Latest News)

Sandeep Kshirsagar Latest News
बंडखोर आमदारांच्या घोळक्यातून दोन आमदार कसे सटकले : अब्दुल सत्तारांनी सांगितला किस्सा

आमदारकीच्या निवडणुकीसाठी जेवढा आतुर नव्हतो तेवढा या निवडणुकीची वाट पाहून होतो, असे संदीप क्षीरसागर म्हणाले. बीड नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार क्षीरसागरांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. 11 जुलै) कार्यकर्ता व पदाधिकारी बैठक झाली. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा हुरुप वाढवला.

मागच्या निवडणुकीत आपले काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या विरोधात बंड करुन त्यांनी काकू-नाना आघाडीच्या माध्यमातून निवडणुक लढवित चांगले यश मिळविले होते. विधानसभा निवडणुकीतही त्यांना बीड शहरातून चांगले मताधिक्य मिळाले. मात्र, मधल्या काळात अनेक नगरसेवकांनी त्यांची साथ सोडली आहे. त्यामुळे आता या निवडणुकीतील त्यांच्या कामगिरीकडे लक्ष लागले आहे.

Sandeep Kshirsagar Latest News
सत्ता गेली अन् धनंजय मुंडे रमले चहाच्या टपरीवर...

या निवडणुकीतून आपल्याला सिद्ध व्हायचे आहे. ज्यांनी प्रामाणिकपणे अडचणीच्या काळात साथ दिलेली आहे, पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले आहेत अशांना यावेळी संधी देवून न्याय दिला जाईल. ज्यांना संधी मिळालेली नाही त्यांनी पुढील निवडणुकीसाठी जोमाने तयारी करावी, असेही क्षीरसागर यावेळी म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादीने अवलंबलेल्या धोरणानुसार बीड नगर पालिका निवडणुकीतही राष्ट्रवादी ओबीसींना २७ टक्के आरक्षण देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी माजी आमदार सय्यद सलीम, माजी आमदार सुनील धांडे, माजी आमदार उषा दराडे, ॲड. डी. बी. बागल, तालुकाध्यक्ष महादेव उबाळे, शहराध्यक्ष बाळासाहेब गुजर, वैजनाथ तांदळे आदींची उपस्थिती होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com