Pankaja Munde : आता लक्ष्य विधानसभा २०२४; पंकजा मुंडेंचा एल्गार !

Pankaja Munde - मी पदर पसरून कुणालाही काही मागायला जाणार नाही. आपली ताकद आपण येत्या विधानसभेत दाखवू.
pankaja munde
pankaja mundeSarkarnama

बीड : पंकजा मुंडे (Pankaja Munde) नाराज आहेत. याला आमदार केला. त्याला खासदार केला या चर्चा आता बंद करा. मी बिलकुल नाराज नाही. मी केवळ २०२४ च्या निवडणुकीच्या तयारीला लागली आहे, असे स्पष्ट करून पंकजा मुंडे यांनी सावरगावच्या दसरा मेळाव्यात आज येत्या विधानसभा निवडणुकीच्या तयारी सुरू केली.(Savargaon Dasara Melava 2022)

pankaja munde
Pankaja Munde : "हो मी वारसा चालवते, पण मुंडेंचा नाही तर.." पंकजा मुंडे गरजल्या

मी पदर पसरून कुणालाही काही मागायला जाणार नाही. आपली ताकद आपण येत्या विधानसभेत दाखवू. पणतीतून ज्योती आणि एका थेंबापासून सागर तयार होतो हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपण आपल्या ताकदीवर येत्या निवडणुकीत उभे राहू, असा विश्‍वास मुंडे यांनी व्यक्त केला. नाराजीची चर्चा आता करू नका, असे वारंवार सांगत त्यांनी २०२४ ची निवडणूक हीच आपल्यासाठी सर्वाधिक महत्वाची असल्याचे स्पष्ट केले.

pankaja munde
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणानंतर राडा, पोलिसांचा हुल्लडबाजांवर लाठीचार्ज

मी शत्रूबद्दलही वाईट बोलत नाही तर ज्यांच्या वारसा चालविते त्यांच्याबद्दल वाईट कसं बोलेन, असा प्रश्‍न करीत गेल्या आठवड्यात माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांचे त्यांनी खंडन केले. गेल्या आठवड्यात बोलताना लोकांच्या मनात असेल तर मला पंतप्रधान नरेंद्र मोदीही संपवू शकत नाहीत, असे त्यांचे विधान माध्यमांतून आले होते. त्यावर तातडीने ट्विटच्या माध्यमातून मुंडे यांनी आपले विधान चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर आणण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. त्याचा संदर्भ देत आज मुंडे यांनी ज्या पक्षात व्यक्तीपेक्षा संघटन मोठे आहे अशा पक्षाच्या संस्कारात मी वाढले असल्याने मी असं बोलूच शकत नाही, असे त्यांनी सांगितले.

जे.पी.नढ्ढा आमचे नेते आहे. पक्षाची शिस्त माझ्यासाठी महत्वाची आहे. मला काहीही मिळाले नाही, याचे दुःख मला नाही. समाजाच्या हितासाठी जे होत असेल ते मला मान्य आहे. समाजाला बांधायचे सोडून समाजात भिंती उभ्या करण्याचा प्रयत्न केला तर त्याला क्षमा करणार नाही. मी क्षमाशील आहे, पण तुम्ही त्याला क्षमा करणार नाही याची मला खात्री आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com