Laxman Hake Rayat Shikshan Sanstha : लक्ष्मण हाकेंचा 'रयत'बाबत मोठा दावा...

OBC Laxman Hake Makes Big Claim on Rayat Shikshan Sanstha President Post in Nanded : रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदाबाबत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी नांदेड इथं बोलताना मोठी खळबळ उडवून दिली.
Laxman Hake
Laxman HakeSarkarnama
Published on
Updated on

Rayat Shikshan Sanstha news : ओबीसी नेते लक्ष्मण हाके अलीकडच्या काळात पवार कुटुंबियाना दिवसेंदिवस टार्गेट करणे अधिकच वाढवलं आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार अध्यक्ष असलेल्या रयत संस्थेच्या अध्यक्षपदावरून लक्ष्मण हाके यांनी मोठा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.

रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष राज्याचा मुख्यमंत्री असावा, असा नियम आहे. असे असताना त्या नियमात खाडाखोड करत, रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवार यांना कायम करण्यात आल्याचा दावा लक्ष्मण हाके यांनी केला.

ओबीसी (OBC) आरक्षण बचावासाठी संघर्ष करणारे लक्ष्मण हाके नांदेड दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबियांना टार्गेट गेले. शरद पवार आणि अजित पवार यांच्याच परिवारामध्ये सगळी पद आहेत, कशासाठी पाहिजे एवढी सगळी पद? एका घरामध्ये एवढी पद, असं इथं होताना दिसत नाही, असे आक्षेप लक्ष्मण हाके यांनी नोंदवला.

रयत शिक्षण संस्थाचा मुद्दा पुढे करत, या संस्थेचा अध्यक्ष राज्याचा मुख्यमंत्री असावा, असा नियम आहे. असं असताना त्या नियमात खाडाखोड करून रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवार (Sharad Pawar) यांना कायम करण्यात आलं. या संस्थेवर पवार परिवारातीलच सदस्य का लागतात? असा सवाल केला.

Laxman Hake
Prasad Tanpure Letter to Ajit Pawar : '...तर कृषी संशोधनाच्या अस्तित्त्वाला धोका'; माजी खासदार तनपुरेंचं अजितदांदाना पत्र

कारखाने तुमचे, बँका तुमच्या, शिक्षण संस्था तुमच्या, कर्मवीर भाऊराव पाटील यांची रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदावर देखील पवार आहेत. महाराष्ट् सरकारच्या तिजोरीवर दरोडा घालणारे अजित पवार यांनाच का लागते सातत्याने अर्थमंत्रीपद? असा सवाल देखील लक्ष्मण हाके यांनी केला.

Laxman Hake
Karjat Sarpanch Disqualification : सरपंचाला स्वतःच्या मुलाला काम देणं भोवलं; जिल्हाधिकाऱ्यांकडून अपात्रतेच्या कारवाईचा दणका

आमदार मिटकरींना चॅलेंज

आमदार अमोल मिटकरी यांना चॅलेंज करत, या प्रश्नांची उत्तरे मिळाली का? मी माझ्या चालकाचा पगार दिला नाही, असं म्हणत असशील, तर मी माझ्या चालकाचा पगार दिलेला आहे. माझ्याकडे बारामती ॲग्रो सारखा अकाउंट नाही, उपरोधिक टोला लक्ष्मण हाके यांनी आमदार मिटकरी यांना लगावला.

बोलायचो थांबणार नाही...

माझ्या कार्यकर्त्यांनी चालकाला कधी पाच हजार, तर कधी दहा हजार, तर कधी वीस हजार दिले. चूक आमची एवढी झालेली आहे की आम्ही त्याची सही घेतली नाही. तो चालक आमचा कार्यकर्ता आहे. आम्ही त्याचा पगार देऊ, पण हे अजित पवार हे आमच्या ओबीसींना 10 हजार, वीस हजार कोटी रुपये आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणे देणार आहेत का? माझ्यावर वैयक्तिक हल्ले करून काही मिळणार नाही, हा लक्ष्मण हाके बोलायचं थांबणार नाही, असा इशारा देखील दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com