Karjat Sarpanch Disqualification : सरपंचाला स्वतःच्या मुलाला काम देणं भोवलं; जिल्हाधिकाऱ्यांकडून अपात्रतेच्या कारवाईचा दणका

Karjat Ghumari Sarpanch and Gram Panchayat Member Disqualified by Ahilyanagar District Collector : कर्जत तालुक्यातील घुमरी ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य यांच्या अपात्रतेचा निकाल जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.
Karjat Sarpanch Disqualification
Karjat Sarpanch DisqualificationSarkarnama
Published on
Updated on

Sarpanch and Gram Member Disqualified : सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य असताना, त्यांच्या मुलांनं ठेकेदारी करत काम केल्याचे निदर्शनास आले म्हणून सरपंच अन् ग्रामपंचायत सदस्याला अपात्र करण्याचा निकाल जिल्हाधिकारी डाॅ. पंकज आशिया यांनी दिला.

कर्जत तालुक्यातील घुमरी ग्रामपंचायत सरपंच संगीता संजय अनभुले आणि सदस्य मंदा अनभुले यांना अपात्र ठरविल्याचा हा निकाल आहे.

सरपंच संगीता अनभुले यांचा मुलगा जयदत्त यांची भाग्यश्री अर्थमुव्हर्स ही ठेकेदार एजन्सी आहे. घुमरी ग्रामपंचायतीच्या (Gram Panchayat) हद्दीतील निंबाळकर वस्ती ते दत्त मंदिर रस्त्यावर भाग्यश्री अर्थमुव्हर्स या ठेकेदार एजन्सीने मुरुमाच्या 90 खेपा टाकल्या होत्या. सरपंच आणि ग्रामसेवकाच्या सहीने 24 जुलै 2019 रोजी त्याबद्दल 25 हजार 560 रुपयांचा धनादेश दिला होता.

ग्रामपंचायत सदस्य मंदा अनभुले यांचा मुलगा चंद्रकांत यास दलितवस्ती आणि चितळेवस्ती इथं प्रत्येकी एक बोअरवेल घेतल्याबद्दल 56 हजार 136 रुपये धनादेशाद्वारे दिले होते. या दोन्ही कामांच्या अनुषंगाने ॲड. शिवाजी अनभुले, संजय अनभुले, सचिन अनभुले, सचिन अनभुले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे (Collector) ग्रामपंचायत विवाद अर्ज 2024 मध्ये दाखल केला. या अर्जावर जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी झाली.

Karjat Sarpanch Disqualification
Prasad Tanpure Letter to Ajit Pawar : '...तर कृषी संशोधनाच्या अस्तित्त्वाला धोका'; माजी खासदार तनपुरेंचं अजितदांदाना पत्र

सरपंच संगीता अनभुले यांनी बचाव केला की, महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतून रस्त्यावर मुरूम टाकण्याचे काम झाले आहे. हे काम यापूर्वी झालेले आहे. सरपंच आणि ग्रामसेवकांनी केवळ या पदावर असल्याने धनादेशावर सही करून बिल दिले आहे. सरपंचाची दोन्ही मुले विवाहित असून, ते विभक्त राहत आहेत. महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचा सरकार निर्णय 12 ऑगस्ट 2016 नुसार या योजनेतून काम केल्यास कोणी अपात्र ठरत नाही.

Karjat Sarpanch Disqualification
Mumbai Zoo Penguin Controversy : पेंग्विन पिल्लांच्या नावांवरून राजकारण तापलं; भाजप म्हणतं, इंग्रजीत नावं का?

ग्रामपंचायत सदस्य मंदा अनभुले यांनी बचाव केला की, दलितवस्ती आणि चितळेवस्ती इथं पाणीटंचाई निर्माण झाल्याने तातडीने दोन बोअरवेल घेण्यात आले. हे काम मिरजगाव इथल्या गणेश बोअरमिल्सने केले. त्या कामाचे बिल ग्रामपंचायतीला दिले आहे. रात्रीच्या वेळेस बोअरवेल घेतल्याने मुलगा चंद्रकांत यांनी तातडीने बोअरवेलचे पैसे दिले, तसेच मुलगा विभक्त राहत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी म्हणणे ग्राह्य धरले नाही. सरपंच संगीता अनभुले आणि सदस्या मंदा अनभुले यांना अपात्र ठरविल्याचा निकाल दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com