Maratha Reservation News : जरांगेंच्या उपोषणाला संभाजीराजेंनी भेट दिल्यानंतर आता ओबीसी नेत्यांनी वडीगोद्रीत यावे यासाठी दबाव ?

OBC leaders should visit the protest in Vadigodri, or else? : हाके, वाघमारे यांनी संभाजीराजे छत्रपती यांना राजे म्हणावे का? असा सवाल करत ते विधानसभा निवडणुकीच्या मतांचे गणित जमते का? याचा हिशेब मांडण्यासाठी अंतरवालीत आले होते, अशी टीका केली.
Maratha REservation, OBC Reservation
Maratha REservation, OBC ReservationSarkarnama
Published on
Updated on

Maratha-OBC Reservation News : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत सुरु केलेल्या उपोषणाला सात दिवस झाले आहेत. प्रकृती बिघडल्यामुळे आज संभाजीराजे छत्रपती यांनी अंतरवालीत येऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली. तर अंतरवालीपासून जवळच असलेल्या वडीगोद्रीत ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या वतीने सुरू असलेल्या उपोषणाकडे मात्र नेत्यानी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी ओबीसीतून मराठा आरक्षणाची मागणी केल्यानंतर राज्यात दोन्ही समाज रस्त्यावर उतरले होते. छगन भुजबळ यांच्यासह राज्यातील अनेक ओबीसी नेत्यांनी एल्गार सभा घेत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा मागणीला विरोध दर्शवला होता. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत मराठा-ओबीसी संघर्षाचा फटका सत्ताधारी महायुतीला बसला.

जरांगे यांच्या मागणीला विरोध आणि आरक्षण बचावसाठी ओबीसीचे नेते प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांनी यापुर्वी वडीगोद्रीमध्ये उपोषण केले होते. तेव्हा छगन भुजबळ, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांनी उपोषणस्थळाला भेट देऊन हाके, वाघमारे यांना आपला पाठिंबा दर्शवला होता. मात्र विधानसभा निवडणुक दोन महिन्यावर असताना मराठा आणि ओबीसी समाजाच्या वतीने सुरु असलेल्या आंदोलनाने वातावरण तापले आहे.

Maratha REservation, OBC Reservation
Manoj Jarange Patil: जरांगे पाटलांच्या उपोषणावर नाशिकमधून आंदोलकांची "ही" मोठी घोषणा!

जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी भेट देऊन संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांच्या मागणीला पाठिंबाही दर्शवला. (OBC Reservation) या भेटीनंतर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांनी संभाजीराजे यांच्यावर टीका केली. तर ओबीसी नेते आंदोलनाकडे फिरकले नाही, याबद्दल ओबीसी आंदोलकांनी नाराजी व्यक्त करत थेट निवडणुकीत धडा शिकवण्याचा इशारा दिला.

गेवराई येथून मोटारसायकल रॅली काढत ओबीसी आंदोलकांनी वडीगोद्रीतील आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. तसेच सोलापूर-धुळे महामार्गावर चक्काजाम करण्याचा प्रयत्न केला. दोन दिवसात ओबीसी नेते आंदोलनस्थळी आले नाही, तर त्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निश्चित धडा शिकवू, असा सज्जड दम यावेळी आंदोलकांनी भरला.

Maratha REservation, OBC Reservation
OBC reservation : ओबीसींना पाडून मनोज जरांगेंचा जातीच्या वर्चस्वासाठी लढा; लक्ष्मण हाकेंनी सर्वच काढलं...

तर दुसरीकडे हाके, वाघमारे यांनी संभाजीराजे छत्रपती यांना राजे म्हणावे का? असा सवाल करत ते विधानसभा निवडणुकीच्या मतांचे गणित जमते का? याचा हिशेब मांडण्यासाठी अंतरवालीत आले होते, अशी टीका केली. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सातवा तर वडीगोद्री येथील ओबीसी आंदोलनाचा पाचवा दिवस आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला भेट देत पाठिंबा दर्शवल्यानंतर राज्यातील ओबीसी नेत्यानी वडीगोद्रीतील आंदोलनाला भेट द्यावी, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. येत्या काही दिवसात अंतरवाली आणि वडीगोद्रीत मराठा-ओबीसी नेत्यांच्या चकरा वाढण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com