OBC Rally In Maharashtra News : राज्यात लवकरच `ओबीसी ऐक्य यात्रा`, काढणार..

Ncp News : ऐक्य यात्रेच्या माध्यमातून राज्यात मोठे शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न देखील आखाडे व राष्ट्रवादी करणार आहे.
OBC Rally In Maharashtra News
OBC Rally In Maharashtra NewsSarkarnama
Published on
Updated on

Beed News : ओबीसींची जनगणना झाली पाहिजे, या व इतर मागण्यांसाठी लवकरच राज्यात `ओबीसी ऐक्य यात्रा`, काढण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी ओबीसी सेलचे (OBC Rally In Maharashtra News) प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी सांगितले. सर्व ओबीसींनी एकत्रित येऊन वज्रमुठ बांधली पाहिजे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

OBC Rally In Maharashtra News
Ncp Mla Allegation On Guardian Minister : पालकमंत्री सावे एजंटामार्फत दहा टक्के वसुली करतायेत..

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) ओबीसी सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील सर्वच आजी-माजी आमदारांकडून आखाडे यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. (Beed) धनंजय मुंडे यांनी स्वतः कल्याण आखाडे यांना फेटा बांधून त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी सत्काराला उत्तर देतांना आखाडे म्हणाले, राज्यात ओबीसींची ताकद मोठी आहे, या ताकदीच्या जोरावर आपण आपल्या मागण्या रेटल्या पाहिजे आणि त्या पुर्ण करून घेतल्या पाहिजे. (Marathwada) त्यासाठी ओबीसींची एकजूट आणि वज्रमुठ दिसली पाहिजे. ती बांधण्यासाठी लवकरच राज्यात `ओबीसी ऐक्य यात्रा`, काढण्यात येणार आहे.

कल्याण आखाडे यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेवरून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत त्यांची निवड जाहीर करत त्यांना नियुक्ती पत्र दिले होते. सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या कल्याण आखाडे यांनी खऱ्या अर्थाने आता कामाला सुरूवात केली आहे.

सावता परिषदेच्या माध्यमातून राज्यातील २७ जिल्ह्यांमध्ये आखाडे यांनी आपला जनसंपर्क वाढवलेला आहे. यामुळे बीड जिल्ह्यासह सावता परिषदेचे जाळे असणाऱ्या २७ जिल्ह्यांमधील ओबीसीची मोठी ताकद राष्ट्रवादीच्या पाठीशी उभी राहणार असल्याचे बोलले जाते. ओबीसी ऐक्य यात्रेच्या माध्यमातून राज्यात मोठे शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न देखील आखाडे व राष्ट्रवादी करणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com