Beed News : बीडचे पालकमंत्री तथा राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांच्यावर आष्टी येथील राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी गंभीर आरोप केले आहेत. (Ncp Mla Allegation On Guardian Minister) पालकमंत्री जिल्ह्यात एजंटांमार्फत दहा टक्क्यांची वुसली करत आहेत, आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना दहा टक्के कमीशन देवून अनेक कामी आणली आहेत, असा दावा देखील आजबे यांनी केला आहे. या आरोपानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
अतुल सावे (Atul Save) यांच्याकडे बीड जिल्ह्याचे पालकत्व दिले, मात्र ते पुरेसा वेळ देत नाहीत, कधी येत नाहीत. जिल्ह्यातील विकासकामे खोळंबली आहेत, अशी टीका त्यांच्यावर सातत्याने केली जाते. (Beed News) गेल्या महिन्यात झालेल्या अवकळी पाऊस आणि गारपीटीने जिल्ह्यात शेती व मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, जनावरे दगवाली होती, तर अनेकांची घरेही पडली होती.
मात्र त्यावेळीही पालकमंत्री म्हणून सावे यांनी जिल्ह्याचा दौरा केला नव्हता. त्यामुळे आधीपासूनच सावे यांच्याबद्दल नाराजीचे वातावरण होते. त्यात आता राष्ट्रवादीच्या आमदाराने त्यांच्यावर चक्के दहा टक्के वसुलीचा आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. (Balasaheb Ajbe) आमदार बाळासाहेब आजबे यांनी पत्रकार परिषद घेवून हे गंभीर आरोप केले आहेत.
आजबे म्हणाले, अतुल सावे हे एजंट नेमून विकास कामाच्या नावाखाली टक्केवारी गोळा करत आहेत. त्यांनी जिल्ह्यातून कामांसाठी १० टक्क्यांनी वसुली केलीय. आमच्या अनेक कार्यकर्त्यांनी १० टक्के देऊन कामे आणली आहेत. टक्केवारी दिल्याशिवाय एकही काम त्यांनी दिले नाही, असा आरोपही आजबे यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.