Omraje : विरोधकांनो पेज हॅक कराल, लोकांच्या मनातील प्रतिमा कशी डिलीट करणार?

पत्रकार परिषद त्या पेजवरुन हटविण्यात आली आहे. त्यानंतर मशालीच्या उद्घाटनाचा कार्यक्रमही त्यावरुन हटविण्यात आला असुन महत्वाचे व्हीडीओ डिलीट होत असल्याचे लवकर लक्षात आले. (Mp Omraje Nimbalkar)
Mp Omprakashraje Nimbalkar
Mp Omprakashraje NimbalkarSarkarnama

उस्मानाबाद : खासदार ओमराजे निंबाळकर यांचे फेसबुक पेज राजकीय विरोधकांनी हॅकरच्या मदतीने हॅक करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार आनंदनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. (Osmanabad) पेजला मिळत असलेला प्रतिसाद पाहुन राजकीय विरोधकाने हा रडीचा डाव खेळल्याचा आरोप खासदार ओमराजे (Omprakashraje Nimbalkar) यांनी केला आहे.

पेजवरुन प्रसिध्द झालेले महत्वाचे व्हीडीओ डीलीट करण्याचा केविलावाना प्रयत्न झाल्याचे लक्षात आल्यावर आपण फेसबुकला विनंती करुन पेज ब्लॉक केल्याची माहितीही दिल्याचेही त्यांनी सांगितले. (Marathwada) ठाकरे सेनेशी प्रामाणिक राहिल्यानंतर झपाट्याने फेसबुक पेजवर ओमराजे समर्थकांची संख्या झपाट्याने वाढत होती.

त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमाची अथवा पोस्टची चर्चा सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायची. या सगळ्या गोष्टीचा मनात राग धरुन राजकीय विरोधकांनी हॅकर्सच्या मदतीने पेजवरील काही व्हीडीओ डिलीट करण्यास सूरुवात केली. ओमराजे यांच्या ही बाब लक्षात आली. कोणीतरी पेज हॅक करुन हा प्रकार करत असल्याने तातडीने फेसबुकला पेज ब्लॉक करण्याची विनंती केली.

सध्या हे पेज बंद असुन त्यांनी पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली. ओमराजे यांच्या म्हणण्यानुसार राजकीय विरोधकांचे पेजवरुन काही नोटीफिकेशन आल्याने सर्व प्रकार त्यांच्याच माध्यमातुन झाले आहे. जनतेचा वाढता प्रतिसाद ही त्यांनी दिलेली प्रामाणिक कामाची पावती असते, विरोधकांच्या अशा वागण्याने लोकांच्या मनातील माझी प्रतिमा ते डिलीट कशी करणार?

Mp Omprakashraje Nimbalkar
सुप्रीम कोर्टाचा ठाकरे गटाला धक्का : वॉर्डसंख्या 'जैसे थे' राहणार!

याबाबत चौकशीनंतर सत्य सर्वांसमोर येणारच आहे, माझ्याकडे सोशल मिडीयाची कोणतीही वेगळी यंत्रणा नसताना किंवा त्यावर कोणत्याही प्रकारे खर्च न करता वाढलेली लोकप्रियता काहींच्या नजरेत खुपूत आहे. मधल्या काळात पत्रकार परिषद घेतली होती, ती पत्रकार परिषद त्या पेजवरुन हटविण्यात आली आहे. त्यानंतर मशालीच्या उद्घाटनाचा कार्यक्रमही त्यावरुन हटविण्यात आला असुन महत्वाचे व्हीडीओ डिलीट होत असल्याचे लवकर लक्षात आले. अन्यथा त्यावरील सर्वच डाटा डिलीट करण्यात आला असता, अशी भिती देखील ओमराजे यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com