Dharashiv Political News : शिवसेना ठाकरे गटाचे धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर हे आपल्या फिटनेससाठी ओळखले जातात. नियमित योगा, धावणे, घोडस्वारी हा त्यांचा नित्यक्रम ठरलेला असतो. मॅरेथाॅन स्पर्धेत सहभाग घेऊन धावणे हा जणू त्यांचा छंदच. अशाच एका मॅरेथाॅनमध्ये सहभागी होत ओमराजे यांनी आपल्या फिटनेसचे दर्शन घडवले. एक तास एक्कावन्न मिनिटे सलग धावत त्यांनी 21 किलोमीटरचे अंतर पूर्ण केले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा उत्साह पाहून धाराशिवमधील निवडणुकीची रेस ते जिंकणार का? हे पाहावे लागणार आहे. तर, कार्यकर्त्यांचे आपल्याला रात्री कितीही वाजता फोन आले, तरी आपण ते घेतो आणि त्यांचे प्रश्न सोडवतो हे ओमराजे आवर्जून सांगतात. एवढेच नाही तर हा दावा करतांना त्यांनी एक लाखाची पैजही लावली होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ओमराजे(Omraje Nimbalkar) यांच्याबद्दल असे अनेक किस्से मतदारसंघात चर्चिले जातात. यापेक्षा अधिक चर्चा होते ती त्यांच्या फिटनेसची. राजकारण करतांना विरोधकांना धोबीपछाड द्यायचा म्हटलं की, तल्लख बुद्धी आणि सृदृढ, निरोगी शरीर लागते. त्यासाठी मेहनतही घ्यावी लागते. असं ओमराजे सांगतात.
ओमराजे आपल्या फिटनेसच्या बाबतीत जरा अधिकच जागृक आहेत. नियमित योगा, धावणे, चालणे, घोडस्वारी, सायकलिंगच्या माध्यमातून ते गेल्या अनेक वर्षापासून स्वतःला फीट ठेवत आले आहेत. नुकताच त्यांचा उत्कृष्ट खासदार म्हणून एका खासगी संस्थेने सत्कारही केला. धावणे हा ओमराजे यांचा आवडता विषय असल्याने ते कायम मॅरेथॉनस्पर्धेत सहभागी होत असतात.
पंढरपूर येथे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित (आबा) पाटील यांनी आयोजित केलेल्या पंढरपूर मॅरेथॉन स्पर्धेत ओमराजे यांनी भाग घेतला. या स्पर्धेत 1 तास 51 मिनिटात 21 किमी धावल्याची माहिती स्वत: ओमराजे यांनीच एक्सवर पोस्ट शेअर करत दिली.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.