Ajit Pawar On krishna-bhima stabilization: फडणवीसांच्या आरोपावर अजित पवारांनी थेट इतिहासच सांगितला...

Baramati Politics मराठवाड्याच्या वाट्याचे पाणी बारामतीत आडले होते, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता
Ajit Pawar On krishna-bhima stabilization:
Ajit Pawar On krishna-bhima stabilization:Sarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar On krishna-bhima stabilization: मराठवाड्याच्या वाट्याचे पाणी बारामतीत आडले होते, आमच्या सरकार आल्यानंतर ते पाणी पुन्हा मराठवाड्याच्या वाट्याला देण्याचे काम केले. असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. शुक्रवारी (16 जून) तुळजापूरात तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर कृष्णा- मराठवाडा सिंचन प्रकल्पाची पाहणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावेळी त्यांनी हे आरोप केले. त्यांच्या या आरोपांना आज (17 जून) विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे.

Ajit Pawar On krishna-bhima stabilization:
Praful Patel on Ajit pawar : 'माझे अन॒ शरद पवारांचे संबंध किती गहन आहेत, हे कळायला अजितदादांना अनेक वर्षे लागतील'

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, बारामतीत कुठलही पाणी अडकलं नाही, कृष्णा भिमा स्थिरीकरणासंदर्भात फडणवीस साहेबांनी खरी वस्तुस्थिती सांगावी, आपण पाणी देत असताना याच शहरात दिवंगत विलासराव देशमुख यांच्या नेतृत्त्वात बैठका झाल्या. त्यावेळी मराठवाड्याच्या महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अधिकारात येणारे मराठवाड्याच्या हक्काचे पाणी, जे उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांना मिळालं पाहिजे, असा निर्णय झाला. नीरा नदीवर दोन धरणांची काम केली. ती जवळपास पूर्णत्वास आली आहेत. ते पाणी चंद्रभागेला न जाता ते बोगद्यातून उजनीत आणलं. उजनीतून उचलून मराठवाड्याला (Marathwada) देण्याचा निर्णय झाला. पण बोगद्याची काम व्हायला वेळ लागतो. त्यात बारामतीचा प्रश्न आला कुठे, फक्त बारामतीचं नाव घेतलं की त्याला वेगळं महत्त्व प्राप्त होतं.

फडणवीसांचे आरोप ?

मराठवाड्याच्या वाट्याचे पाणी बारामतीत आडले होते, पण आमचे सरकार आल्यावर ते पाणी पुन्हा मराठवाड्याच्या वाट्याला देण्याचे काम आम्ही केलं. महाविकास आघाडीने मात्र कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाकडे दुर्लक्ष केलं, असा आरोपही त्यांनी केला. फडणवीस म्हणाले की, जून 2024 पर्यंत कृष्णा - मराठवाडा सिंचन प्रकल्पाचे पाणी नागरिकांपर्यंत पोहोचेल. मी मुख्यमंत्री असताना कृष्णा- मराठवाडा सिंचन प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर सुरू करण्यात आले. पण महाविकास आघाडीच्या सरकारने एकही सुधारीत मान्यता दिली नाही. त्यामुळे ते काम रखडले होते. (Maharashtra Politics)

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com