Sushma Andhare News, Latur
Sushma Andhare News, LaturSarkarnama

Sushma Andhare News : महाराष्ट्रात ठाकरेंच्या शिवसेनेचे शंभर आमदार निवडून येणार..

Shivsena : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मोठी सहानुभूतीची लाट आहे.
Published on

Marathwada : राज्यात ४० लोकांनी गद्दारी केली असली, तरी हे सरकार औटघटकेचे आहे. या सरकारविरोधात राज्यातील जनतेमध्ये मोठा रोष आहे. महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने तो मी अनुभवला आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे शंभर आमदार निवडून येतील, असा विश्वास शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी व्यक्त केला.

Sushma Andhare News, Latur
Chandrakant Khaire News : परिवर्तन अटळ, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पुन्हा महाविकास आघाडीचीच सत्ता..

महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) संयुक्त सभेनिमित्त घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत लातूर येथे त्या बोलत होत्या. सुषमा अंधारे म्हणाल्या, डोक्यावर पडलेली काही लोक अशोभनीय असं वर्तन करून बेताल वक्तव्य करत सुटलेले आहेत. (Shivsena) परंतु हे औट घटकेचे सत्ताधारी असून यांची सत्ता निश्चित जाणार आहे. सत्ता वाचवण्यासाठी नवनवीन प्रयोग केले जात आहेत, पण हे सगळे प्रयोग फसवे असून या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची ताकद जोमाने वाढत आहे.

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने फिरत असून लोकांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहता सत्ताधारी हादरले आहेत. काही महिन्यांपुर्वी षड्यंत्र रचून सत्तेचा दुरुपयोग करत आमच्यातील ४० गद्दार जरी गेले असले, तरी या महाराष्ट्रात पुन्हा महाविकास आघाडीचीच सत्ता येणार हे निश्चित आहे.

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना शंभरीचा आकडा पार करेल, हा आत्मविश्वास मला वाटतो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मोठी सहानुभूतीची लाट आहे. ही लाटच आत्ताच्या सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा त्यांना दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, असा दावा देखील अंधारे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com