Ambadas Danve Allegation News
Ambadas Danve Allegation NewsSarkarnama

Ambadas Danve Allegation News : विरोधी पक्षनेते दानवे यांचे आता राज्य उत्पादन शुल्क विभागावर हफ्तेखोरीचे आरोप..

Aurangabad : दानवे यांनी स्वतः शहरातील मद्य विक्री करणाऱ्या दुकानांची पाहणी केली.
Published on

Shivsena : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी काही दिवसांपुर्वी पोलिसांवर हप्तेखोरीचे आरोप करत अवैध धंदे, दारू विक्रीला अभय दिले जात असल्याचे गंभीर आरोप केले होते. एवढेच नाही तर तत्कालीन पोलिस आयुक्त डाॅ.

Ambadas Danve Allegation News
Health Minister Tanaji Sawant News : आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्राला अव्वल क्रमाकांचे राज्य करायचे आहे..

निखील गुप्ता यांच्या आशिर्वादानेच हे सुरू असल्याचे जाहीर पत्रका परिषद घेवून आरोप केले होते. (Shivsena) त्यानंतर आठवडाभरातच गुप्ता यांची बदली झाली. (Aurangabad) आता दानवे यांनी आपला मोर्चा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे वळवला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मनमानी कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांना या विभागावर देखील हप्तेखोरीचे आरोप केले आहेत. (Marathwada) मद्यविक्री करणाऱ्या दुकानांवर जाहिरात करणे हे बेकायदेशीर असून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादाने यांच्या हप्तेखोरीने हे सर्रास सुरू असल्याचा गंभीर आरोप दानवे यांनी केला आहे.

एवढ्यावरच न थांबता दानवे यांनी स्वतः शहरातील मद्य विक्री करणाऱ्या दुकानांची पाहणी केली. यावेळी त्यांच्या लक्षात आले की व्यापारी राजरोसपणे जाहिरातीचे मोठ मोठे आकर्षित करणारे फलक लावतात. नागरिकांना मद्य पिण्यासाठी उत्तेजीत केले जात असून शहरातील जवळपास ८०% दुकानांवर जाहिरातीचे फलक पाहायला मिळाले.

हे फलक बेकायदेशीर असून प्रशासनाने याची दखल घ्यावी. लवकरात लवकर योग्य ती ठोस पाऊले उचलावीत व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा चाललेला मनमानी कारभार, हफ्तेखोरी थांबवावी, असा इशारा देखील दानवे यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com