Osmanabad : पालिकेतील पावणेदोन कोटी अपहार प्रकरणी अडीच वर्षाने लेखापालास अटक

आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष शेजाळ व त्यांच्या पथकाने पालिकेचे तत्कालिन लेखापाल वडमारे यांना सोमवारी अटक केली आहे. (Osmanabad District)
Umarga Municipal Council
Umarga Municipal CouncilSarkarnama
Published on
Updated on

उमरगा : पालिकेत विविध योजनेतील पावणेदोन कोटी रुपयाच्या अपहार प्रकरणी ३१ ऑगस्ट २०१९ रोजी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर अडीच वर्षांनी उस्मानाबादच्या आर्थिक गुन्हे शाखेने तत्कालिन लेखापाल विनायक वडमारे यांना अटक केली आहे. (Osmanabad) सहापैकी चार आरोपींना दिड वर्षात टप्याटप्याने अटक करण्यात आली होती. (Marathwada) आता या प्रकरणात सोमवारी (ता.७) रात्री अंबाजोगाई येथून तत्कालिन लेखापालास अटक करण्यात आली आहे. (Maharashtra)

दरम्यान मंगळवारी (ता. आठ) न्यायालयाने वडमारे यांना ११ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. उमरगा पालिकेत पहिल्यांदा ४९ लाखाच्या अपहारप्रकरणी ३१ ऑगस्ट २०१९ रोजी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर अपहाराची रक्कम पावणेदोन कोटी झाली. पालिकेचे तत्कालिन लेखापाल विनायक वडमारे, दोन कंत्राटी कर्मचारी धम्मपाल ढवळे, सूरज चव्हाण यांच्यासह सचिन काळे, पवन बाबुराव मात्रे - सोमवंशी व नंतरच्या तपासात नंदकुमार झांबरे अशा सहा जणांची नावे अपहार प्रकरणात समोर आली होती.

या प्रकरणात पहिल्यांदा कंत्राटी कर्मचारी ढवळे याला २२ ऑक्टोबर २०१९ ला अटक झाली होती. नऊ महिन्याने दोन जून २०२० रोजी सचिन काळे, सुरज चव्हाण यांना अटक केली होती. या प्रकरणातील मास्टर माँईड असलेल्या पवन मात्रे याला २३ मार्च २०२१ रोजी सोलापूर येथून अटक करून पोलिसांनी त्याच्याकडील इनोव्हा कारही जप्त केली होती. झांबरे यांनी अटकपूर्व जामिन मिळवला होता.

दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष शेजाळ व त्यांच्या पथकाने पालिकेचे तत्कालिन लेखापाल वडमारे यांना सोमवारी अटक केली आहे. कंत्राटी कर्मचारी ढवळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबादच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार अपहार केलेल्या रक्कमेतील दहा लाख रुपये भरल्यानंतर जामिनाची प्रक्रिया पूर्ण झाली होती.

जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार चव्हाण यांनी दहा लाख २८ हजार रूपये, म्हात्रे १७ लाख, काळे दहा लाख तर झांबरे यांनी २७ लाख ७८ हजार २९२ असे एकुण जवळपास ६५ लाख सहा हजार २९२ रूपये पालिकेत जमा केले आहेत. अपहारातील काही रक्कम भरल्याने पाच जणांना जामीन मंजुर करण्यात आला होता.

Umarga Municipal Council
Aurangabad Congress : जे कधी गांधी भवनाची पायरीही चढले नाही त्यांनाच पदांची खैरात

पावणे दोन कोटी रूपयाचा अपहार होऊन अडीच वर्ष झाली. त्यातील कांही रक्कम वसुल झालेली असली तरी जीएसटी आणि आयकरच्या नियमानुसार एकुण अपहारीत रक्कमेवर २५ टक्के दंड प्रमाणे सध्यस्थितीत त्याची रक्कम ४३ लाख ७५ हजार होते. वार्षिक अठरा टक्के व्याजाची रक्कम ७८ लाख ७५ हजार झाल्याने असे एकुण दोन कोटी ९७ लाख पन्नास हजार अपहार रक्कम गृहीत धरावी लागणार आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून लवकरच याची माहिती न्यायालयात दिली जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com