Osmanabad News : पालकमंत्र्यांविरुद्ध भाजप आमदाराची तक्रार हा खोडसाळपणा..

Marathwada : गेल्या तीन चार वर्षात भुम-परंडा- मतदारसंघावर झालेला अन्याय, निधीचा असमतोल त्यांना दिसला नाही का ?
Minister Tanaji Sawant-Rana Patil News, Osmanabad
Minister Tanaji Sawant-Rana Patil News, OsmanabadSarkarnama

Rana Patil : जिल्ह्याच्या निधीवाटपामध्ये कुठेही असमानता झालेली नसुन भाजप आमदारांनी केलेली तक्रार हा खोडसाळपणा असल्याचे शिवसेनेचे (Shivsena) जिल्हाप्रमुख दत्ता साळुंखे यानी सांगितले. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे नाव न घेता त्यांच्या तक्रारीबद्दल नाराजी व्यक्त केली.

Minister Tanaji Sawant-Rana Patil News, Osmanabad
Shivsena Symbol : शिवसेनेची घटना लोकशाहीविरोधी : 'धनुष्यबाण' शिंदेना बहाल करताना आयोगाची 'ही' भूमिका!

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे, मोहन पणुरे आदी उपस्थित होते. दत्ता साळुंखे म्हणाले की, प्रा.सावंत (Tanaji Sawant) यांनी डिसेंबरमध्ये बैठक घेऊन निधीचे समान वाटप केलेले होते. (Ranajagjeetsingh Patil) त्यावेळी त्यांनी चारही मतदारसंघास समान निधी दिला होता, असे असताना मित्रपक्षाच्या आमदारांनी तक्रार करणे हे दुर्देवी आहे.

गेल्या तीन चार वर्षात भुम-परंडा- मतदारसंघावर झालेला अन्याय, निधीचा असमतोल त्यांना दिसला नाही का ? असा प्रश्नही साळुंखे यांनी उपस्थित केला. प्रा.सावंत जिल्ह्याचे नेते असुन राज्याचे मंत्री आहेत ते एका मतदारसंघाची काळजी करणार नाहीत. पण काही लोकांना त्याना बदनाम करण्याच्या विचारातुन असा प्रकार केला आहे.

धनंजय सावंत म्हणाले की, भाजपच्या आमदारांनी केलेल्या तक्रारीत कसलेही तथ्य नाही, निधी वाटपामध्ये गेल्या काही वर्षात भुम परंडा मतदारसंघावर अन्य़ाय झाला आहे. ती आकडेवारी देखील उपलब्ध असुन त्याचा देखील विचार केला पाहिजे. शिवाय जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत असताना काही ठराविक तालुक्यांनाच निधी दिला जात होता, तो अन्याय नव्हता का ? असे म्हणत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर निशाणा साधला.

मित्रपक्षामध्ये समन्वय असला तरी त्यांनी कोणत्या कारणामुळे अशी तक्रार केली हे समजत नसल्याचेही सावंत म्हणाले. जिल्हा परिषदेमध्ये याद्या कशा बनत होत्या, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी घेऊन प्रा.सावंत यांचे काम सूरु असतांना त्यांची अडवणुक करण्याचा हा प्रकार असल्याचे ते म्हणाले.

Minister Tanaji Sawant-Rana Patil News, Osmanabad
Shivsena Symbol : आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात जाणार!

दोन दिवसांपुर्वीच भाजपचे आमदार राणाजगजीसिंह पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांच्या डीपीडीसीच्या निधीवाटपात अनियमितता केल्याचा आरोप करत थेट नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे लेखी तक्रार केली होती. त्याला आता सावंत समर्थकांकडून उत्तर देण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com