Osmanabad : शिंदेसेना बाळासाहेब, दिघेंच्या विचारांची नाही ; तर मोदी, शहांच्या विचारांची..

पैशाचे आमिष देऊन यांना पक्षात प्रवेश द्यावे लागतात अशी स्थिती आहे. मग हिंदुत्वाच्या विचाराने तुमच्याकडे लोक का येत नाहीत ? (Mla Kailas Ghadge Patil)
Mla Kailas Patil-Cm Eknath Shinde News Osmanabad
Mla Kailas Patil-Cm Eknath Shinde News OsmanabadSarkarnama
Published on
Updated on

उस्मानाबाद : बाळासाहेब ठाकरे यांचे विचार व आनंद दिघे यांच्या शिकवणीचे कारण सांगुन काहीजण शिवसेना सोडून जात आहेत. (Osmanabad) पण बाळासाहेब आणि आनंद दिघेसाहेबांचे नाही, तर नरेंद्र मोदींचे विचार व अमित शहाच्या शिकवणीसाठी ते लोक जात आहेत, असा टोला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास घाडगे पाटील (Kailas Ghadge Patil) यांनी लगावला.

राज्यात शिंदे सरकारचा जो कारभार सध्या सुरू आहे, तो पाहता त्यांना कोणाचे विचार आणि शिकवण आहे हे स्पष्ट होते, असेही पाटील म्हणाले. (Shivsena) शिवसैनिक सन्मान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांचे नाव घेऊन त्यांच्या विचाराचे सरकार असल्याचे सांगणाऱ्या मंडळीनी गद्दारी करुन पाठीत खंजीर खुपसला नसता.

वेदांता फॉक्सकॉनचा मोठा प्रकल्प गुजरातला गेला, तो का गेला ? याचा जाब मोदी किंवा शहाना विचारण्याची हिंमत या सरकारची आहे का? प्रकल्प गेल्यानंतर मोदींनी यापेक्षा मोठा प्रकल्प राज्याला देण्याचे आश्वासन दिले. त्यानी हा प्रकल्प महाराष्ट्राला द्यावा व मोठा प्रकल्प गुजरातला न्यावा, असा टोला देखील पाटील यांनी यावेळी लगावला.

पैशाचे आमिष देऊन यांना पक्षात प्रवेश द्यावे लागतात अशी स्थिती आहे. मग हिंदुत्वाच्या विचाराने तुमच्याकडे लोक का येत नाहीत? असा सवालही पाटील यांनी याप्रसंगी केला. भाजपचे नेते काही झाले तर आम्हीच केल्याचा आव आणतात. मग यावेळी सततच्या पडलेल्या पावसाने झालेले नुकसान अद्यापही जाहीर झाले नाही, याचे श्रेय त्यांचे नेते घेणार आहेत का?

Mla Kailas Patil-Cm Eknath Shinde News Osmanabad
Munde : आमची बहिण मंत्री होती, पण त्यांना परळीला एमआयडीसी आणता आली नाही..

जसे पिक विम्याच्यावेळी श्रेयाचे संदेश मोबाईलवर पाठविले, तसे आताही या श्रेयाचे मेसेज करायला काय हरकत आहे? असा टोला देखील त्यांनी भाजप नेत्यांना लगावला. गोगलगायींच्या नुकसानीची मदत फक्त ४०१ शेतकऱ्यांना मिळते, तेव्हा सत्ताधारी का बोलत नाही?

आता नव्या किडीने सोयाबीनचे मोठे नुकसान होत आहे. त्याचेही पंचनामे करण्यास प्रशासनाला आम्ही भाग पाडले आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे प्रशसानाकडुन पंचनामे करुन घेण्याचे अवाहन देखील घाडगे पाटील यांनी केले. सरकारच्या मानगुटीवर बसुन त्यांच्याकडुन मदत मिळवुन घेतल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com