Osmanabad : कुठे एकनिष्ठ म्हणून सत्कार, तर कुठे गद्दार म्हणून नावाला काळे फासले..

ज्या शिवसेनेने यांना मोठे केले त्या शिवसेनेशीच गद्दारी करणारे आमदार तानाजी सावंत आणि ज्ञानराज चौगुले यांना जिल्ह्यात फिरु देणार नाही. (Shivsena)
Mla Tanaji Sawant Office In Osmananabad
Mla Tanaji Sawant Office In OsmananabadSarkarnama

उस्मानाबाद : ठाकरे सरकारमधील वजनदार मंत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदेसह शिवसेनेच्या चाळीसपेक्षा जास्त आमदारांनी पाच दिवसांपुर्वी बंड पुकारले. (Osmanabad) याशिवाय दरा अपक्ष आमदार देखील शिंदे यांच्या गळाला लागले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये बिघाडी झाली आहे. शिंदेच्या बंडात मराठवाड्यातील १२ पैकी ८ आमदारांचा समावेश आहे.

यात एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातील पाच तर उस्मानाबाद आणि नांदेडच्या प्रत्येकी दोन आणि एका आमदाराचा समावेश आहे. उमरग्याचे ज्ञानराज चौगुले आणि भूम-परांड्याचे (Tanaji Sawant) तानाजी सावंत हे देखील आहेत. (Shivsena) बंडाच्या पाच दिवसानंतर आता बंडखोर आमदारांच्या विरोधात भडका उडायला सुरूवात झाली आहे.

मुंबई, पुणे, कोल्हापूर मध्ये फुटीर आमदारांच्या कार्यालयांवर हल्ले, फलकांना काळे फासण्याच्या घटना घडत आहेत. एकीकडे गद्दारांच्या विरोधात संताप आहे, तर दुसरीकडे जे आमदार शिवसेनेशी एकनिष्ठ राहिल्या त्यांच्या मतदारसंघात सत्कार केला जात आहे. कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्यावर मतदारसंघातील शिवसैनिकांनी पुष्पवृष्टी करत त्यांचे कौतुक केले.

तर आज उस्मानाबाद येथील प्रा. तानाजी सावंत यांच्या संपर्क कार्यालयावर संतप्त शिवसैनिकांनी काळ्या अक्षरात गद्दार असे लिहित त्यांचा निषेध केला. तानाजी सावंत हे उस्मानाबाद जिल्ह्यातील वजनदार नेते म्हणून ओळखले जातात. सहकार क्षेत्रात देखील त्यांची चांगली पकड आहे. आर्थिकदृष्ट्या मजबुत असलेल्या सावंत यांनी नेहमीच जिल्ह्यातील सत्तासुत्र आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला होता.

मातोश्रीवर वजन असल्यामुळे त्यांना कॅबिनेटमंत्री पद देखील मिळाले होते. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर मात्र त्यांना मंत्रीपदाने हुलकावणी दिली होती. त्यामुळे अधूनमधून त्यांची नाराजी समोर यायची. पण संधी मिळताच त्यांनी आपली नाराजी शिंदे यांच्या बडात सहभागी होऊन दाखवून दिली. बंडखोर आमदारांविरुद्ध वातावरण तापत असतांना उस्मनाबादेत देखील त्याचे पडसाद उमटू लागले आहे.

Mla Tanaji Sawant Office In Osmananabad
Raosaheb Danve : असंगाशी संग केल्याने शिवसेनेची दुरावस्था..

शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी हे आंदोलन करण्यात आले. धाराशिव जिल्हा हा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारा असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळे गतवेळच्या मंत्रिमंडळात तानाजी सावंत यांना संधी मिळाली होती.

तरीसुद्धा शिवसेनेसोबत गद्दारी करुन एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेल्या सावंतांना शिवसैनिक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. गद्दारांना यापुढे माफी नाही. ज्या शिवसेनेने यांना मोठे केले त्या शिवसेनेशीच गद्दारी करणारे आमदार तानाजी सावंत आणि ज्ञानराज चौगुले यांना जिल्ह्यात फिरु देणार नाही, असा इशारा शिवसैनिकांनी यावेळी दिला.

सावंत यांच्या शहारतील संपर्क कार्यालयावर शिवसैनिकांनी खेकडा आमदार गद्दार असे लिहित फलकाला काळे फासले आहे. तर काही ठिकाणी मोजक्या सावंत समर्थकांनी घोषणाबाजी करत आपण तानाजी सावंत यांच्यासोबतच असल्याचे सांगितले. एकंदरित काही दिवसांत जिल्ह्यामध्ये शिवेसना विरुद्ध सावंत समर्थक यांच्यात संघर्ष भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com