Uddhav Thackeray News :...अन्यथा त्यांना लाथ मारून बाहेर काढलं असतं; ठाकरेंनी सत्तार अन् शिसरसाटांना सुनावलं

Mahavikas Aghadi News : ''अशा लोकांच्या तोंडून हिंदुत्व बोलायची लायकी नाही. जर हे शिवसेनेत असते तर...''
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhjainagar news : छत्रपती संभाजीनगरमध्ये आज महाविकास आघाडीची संयुक्त सभा होत आहे. या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, अशोक चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित आहेत. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

उद्धव ठाकरे म्हणाले, ''एक गद्दार सुप्रिया सुळे यांना शिवी देतो, मग तुमचं हेच का हिंदुत्व? एक गद्दार सुषमा अंधारे यांच्याबद्दल खालच्या पातळीवर टीका करतो. अशा लोकांच्या तोंडून हिंदुत्व बोलायची लायकी नाही. जर हे शिवसेनेत असते तर त्यांची तसं बोलायची हिंमत झाली नसती.

अन्यथा त्यांना लाथ मारून गेटआऊट म्हटलं असतं. मतं पटत नसतील, तर मतांवर बोला. पण महिलांविषयी बोलणं खपवून घेतलं जाणार नाही. अशा लोकांनी गौरव यात्रा काढली. हे शोभत नाही'', असं म्हणत ठाकरेंनी अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट यांना सुनावलं.

''आज भाजपबरोबर कोण राहीलं? त्यांच्याबरोबर असणारे अनेक घटक पक्ष सोडून गेले. बरोबर असणाऱ्या पक्षांना ज्या वेळी गरज होती त्यावेळी वापरून घेतलं आणि नंतर लाथ मारली. आमच्या पक्षाचं चिन्ह चोरलं, नाव चोरलं आणी आता तर वडिलांच नाव चोरायला निघालेत.

पण मी ते होऊ देणार नाही. मी तुम्हाला आत्ताही सांगतोय आगामी निवडणुकीत तुम्ही मोदींच नाव घेऊन निवडणुकीला सामोरं जा. मी माझ्या वडिलांचं नाव घेऊन सामोरं जातो मग पाहू जनता कोणाच्या मागे आहे'', असं आव्हान उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिंदेंना दिलं.

''हिंडेनबर्गच्या रिपोर्टवर राहुल गांधींनी प्रश्न विचारला तर त्यांना अपात्र ठरवलं. तुम्ही आम्हाला विचारायचं नाही? विचारालं तर लगेच घराघरांत ईडी, सीबीआय घुसवून चौकशी लावायची. अनिल देशमुख यांच्या नातीची चौकशी केली. ते आमचं हिंदुत्व आहे का? पण तुम्ही सगळ्यांना छळता, धाडी टाकता, मग हेच का तुमचं हिंदुत्व?, असा सवालही यावेळी त्यांनी केला.

''तुम्ही शिवसेना फोडली आणि डोक्यावर दगड ठेवून घेतला? चंद्रकांत पाटलांनी म्हटलं की ह्रदयावर दगड ठेवून हे ओझं स्वीकरालं. आता भाजपाला मी विचारतो, शिंदेंच ओझं डोक्यावर घेऊन तुम्ही निवडणुका लढवणार आहात का?'', असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपला केला.

''तुम्ही सभेत म्हणता वाचू का? वाचू का? त्यांना मला सांगायचं आहे तुमच्या सभेत तुम्ही कागदावरचं पाहून वाचू शकता, पण मतदान झाल्यावर तुम्ही वाचू शकणार नाहीत'', असा घणाघात यावेळी भाजप आणि शिंदे यांच्यावर ठाकरेंनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com