Abdul Sattar : आमचे मुख्यमंत्री साधेपणा जपणारे, तर आधीचे चमच्याने दूध पिणारे..

दसरा मेळाव्याला जास्त लोक येतील त्या गावांना जास्तीचा निधी व ज्या गावातून कमी लोक दसरा मेळाव्यात येतील त्या गावासाठी कमी निधी दिला जाईल. (Abdul Sattar)
Minister Abdul Sattar-Uddhav Thackeray news, Aurangabad
Minister Abdul Sattar-Uddhav Thackeray news, AurangabadSarkarnma
Published on
Updated on

औरंगाबाद : शिवसेनेचे वाण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच वाट्याला आले आहे, त्यामुळे खैऱ्या, बहिऱ्यांना आता शिवसेनेचे चिन्ह दुर्बिणीद्वारेच पहावे लागेल. त्यांनी स्वप्नातही चिन्हांची अपेक्षा करू नये, अशी टीका कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी शिवसेना व खैरे यांच्यावर केली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर ते चमच्याने दूध पिणारे मुख्यमंत्री होते, अशा शब्दात निशाणा साधला.

राज्याचे कृषिमंत्री झाल्यानंतर अब्दुल सत्तार यांचा नागरी सत्कार सोयगांवमध्ये आज करण्यात आला. या सोहळ्यात सत्काराला उत्तर देतांना सत्तार यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांच्यावर सडकून टीका केली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे साधेपणा जपणारे आहेत, तर यापूर्वीचे मुख्यमंत्री सोन्याच्या चमच्याने दूध पिणारे होते, अशा शब्दात उद्धव ठाकरेंवर तोफ डागली.

सत्तार म्हणाले, ज्या गावातून दसरा मेळाव्याला जास्त लोक येतील त्या गावांना जास्तीचा निधी व ज्या गावातून कमी लोक दसरा मेळाव्यात येतील त्या गावासाठी कमी निधी दिला जाईल. भाजप सोबतच्या युतीबाबत सत्तार यांनी पुन्हा उल्लेख करत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सोयगावात भाजप सोबत युती करणे शक्य नसून मैत्रीपूर्ण लढती बाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे पाठविल्याचे स्पष्ट केले.

राज्यभर जरी भाजप सोबत युती झाली तरी त्यात सिल्लोड-सोयगाव युती बाबत अपवाद राहील. शेवटी भाजपाचा निर्णय अंतिम राहील असेही सत्तार यांनी स्पष्ट केले. माझ्या राजकीय जीवनात सोयगावकरांनी मला कायम साथ दिलेली आहे. त्यांचे उपकार कधीही विसरणार नाही. डोंगर रांगेतील सोयगावचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही.

Minister Abdul Sattar-Uddhav Thackeray news, Aurangabad
Jalna : दानवे-सत्तार स्थानिक स्वराज्य निवडणुकीत एकमेकांशी दोन हात करणार?

शेतकऱ्यांचे सक्षमीकरण साधण्यासाठी तालुक्यात कृषी विभागाच्या योजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी असून शेतकऱ्यांनी चिंता करु नये, कृषी विभागाच्या पोखरा योजनेत सोयगाव मधील अधिकाधिक गावांचा समावेश करण्यात येईल. शेतकऱ्यांना दोन पिके घेता यावी यासाठी तालुक्यात सिंचन व्यवस्थेच्या बळकटीकरण करण्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे सत्तार म्हणाले.

एकनाथराव शिंदे नगर विकासमंत्री असतांना त्यांनी सोयगावच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी दिला. पिण्याच्या पाण्यासाठी योजना मंजूर करून दिली. सिंचन व्यवस्था, आरोग्य व्यवस्थेसह येथील प्रशासकीय इमारत बांधकामासाठी भरघोस निधी दिला. त्यामुळे जनसामान्यांचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी ५ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या बिकेसी मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी प्रचंड संख्येने या, असे आवाहन देखील सत्तार यांनी उपस्थितांना केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com