Deputy CM Ajit Pawar : आमचा राजेश आमदार झाला ! पक्षनिष्ठेचे फळ मिळतेच..

Ajit Pawar congratulate MLA Rajesh Vitekar : विटेकर यांना लोकसभेची उमेदवारी देण्याचा शब्द अजित पवार यांनी दिला होता. पण राष्ट्रवादीत पडलेली फूट, सत्तेतील सहभाग आणि लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात कराव्या लागणाऱ्या तडजोडीत अजित पवारांनी परभणीची हक्काची जागा सोडली.
MLA Rajesh Vitekar- Ajit Pawar
MLA Rajesh Vitekar- Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

NCP Ajit Pawar News : `एकच वादा अजितदादा` ही घोषणा राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता बेंबीच्या देठापासून देतो ते उगाच नाही. अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मुरब्बी, तडकफडक आडपडदा न ठेवता सडेतोड भूमिका मांडणारा नेता म्हणून परिचीत आहेत. पक्षासाठी निष्ठेने, प्रामाणिकपणे मेहनत करणारा कार्यकर्ता तो कुठल्याही भागातला असला तरी तो हेरून त्याला मोठं करण्यात अजित पवारांचा हात कोणी धरू शकत नाही.

त्यांच्या या गुणामुळेच राष्ट्रवादीचा कार्यकर्ता त्यांच्यावर जीवापाड प्रेम करतो. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राज्यात त्यांना मिळालेला प्रतिसाद, कार्यकर्त्यांची फळी पाहता त्यांच्याबद्दल `बोले तैसा चाले` असे जे बोलले जाते ते योग्यच ठरते. (Parbhani) आमचा राजेश आमदार झाला ! अशा शब्दात विधान परिषदेवर नुकतीच निवड झालेल्या परभणी जिल्ह्यातील राजेश विटेकर यांचे अजित पवार यांनी आपल्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी स्वागत केले.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजय जाधव यांना कडवी झुंज देणाऱ्या राजेश विटेकर यांना पुन्हा लोकसभेची उमेदवारी देण्याचा शब्द अजित पवार यांनी दिला होता. त्या दृष्टीने राजेश विटेकर यांनी तयारीही केली होती. पण राष्ट्रवादीत पडलेली फूट, सत्तेतील सहभाग आणि लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात कराव्या लागणाऱ्या तडजोडीत अजित पवारांनी परभणीची हक्काची जागा सोडली.

MLA Rajesh Vitekar- Ajit Pawar
Ajit Pawar : "पालकमंत्री अजितदादा अन् केंद्रीय मंत्री मुरलीअण्णांमध्ये तरी समन्वय आहे का?"

महायुतीमध्ये रासपचे महादेव जानकर यांच्यासाठी राष्ट्रवादीने आपल्या वाट्याची परभणीची जागा देऊ केली. अर्थात राजेश विटेकर यांच्यासह त्यांचे समर्थक नाराज झाले. पण जानकरांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशीच (Ajit Pawar) अजित पवारांनी राजेश विटेकरला तीन महिन्यात आमदार करतो की नाही? पहा, असा वादा विटेकर आणि त्यांच्या समर्थकांना केला.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने हक्काची जागा सोडली पण जानकर पराभूत झाले आणि महायुतीला धक्का बसला. पण अजित पवार यांनी विटेकर आणि त्यांच्या समर्थकांना दिलेला शब्द ते विसरले नव्हते. विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक झाली तेव्हा अजित पवारांनी राजेश विटेकर यांना उमेदवारी दिली आणि पहिल्या पसंतीत निवडूनही आणले.

MLA Rajesh Vitekar- Ajit Pawar
Rajesh Vitekar and Sunil Tatkare : पंढरपूरला दर्शनाला निघालो होतो, तेवढ्यात सुनील तटकरेंचा फोन आला अन्..

काल विटेकर यांच्यासह सर्व नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली. त्यानंतर विटेकर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी त्यांना भेटायला गेले. तिथे अजित पवारांनी विधान परिषद सदस्य पदाचा बॅच राजेश विटेकर यांच्या शर्टावर लावला आणि आमचा राजेश आमदार झाला! अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.

विधान परिषदेचा आमदार म्हणून शपथ घेतल्यानंतर राजेश विटेकर याने आज माझी देवगिरी निवासस्थानी येऊन भेट घेतली. सामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी असलेला राजेश विटेकर, वर्षानुवर्ष निष्ठेने आणि अहोरात्र पक्षाचं काम करत आहे. त्याच्या पक्षनिष्ठेच आणि मेहनतीचं फळ प्राप्त झाले. राजेश सारख्या आमच्या असंख्य राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ निश्चित प्राप्त होईल, असा विश्वास पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी व्यक्त करतो, राजेशला भेटून आनंद झाला, अशा शब्दात अजित पवार यांनी आपल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विश्वासही दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com