Rajesh Vitekar and Sunil Tatkare : पंढरपूरला दर्शनाला निघालो होतो, तेवढ्यात सुनील तटकरेंचा फोन आला अन्..

Rajesh Vitekar NCP State Spokesperson : माझ्यासाठी हे अनपेक्षित होते, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार राजेश विटेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Rajesh Vitekar
Rajesh VitekarSarkarnama
Published on
Updated on

NCP State Spokesperson Rajesh Vitekar News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्ते पदी माझी झालेली निवड अनपेक्षित धक्का होता. माझ्या ध्यानीमनी नव्हते, मी पंढरपूरला दर्शनासाठी निघालो होतो. तेवढ्यात आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचा(Sunil Tatkare) फोन आला आणि मुंबईत महत्वाची बैठक आहे, तुम्हाला यावे लागेल असे त्यांनी सांगितले.

बैठकीला गेल्यावर अचनाक माझ्यावर प्रदेश प्रवक्ते पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. माझ्यासाठी हे अनपेक्षित होते, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार राजेश विटेकर(Rajesh Vitekar) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर पहिल्यादाच परभणीत आलेल्या राजेश विटेकर यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले. जेसीबीमधून फुलांची उधळण आणि ढोल-ताशांच्या दणदणाटात गुलाल उधळत विटेकर यांचे जिल्ह्यात आगमन झाले.

Rajesh Vitekar
Shrijaya Chavan : अशोक चव्हाणांसाठी मुलीचे राजकारणातील लाँचिंग सोपे नाही...

विधान परिषदेवर निवड आणि लगेच पक्षाच्या राज्य प्रवक्ते पदी निवड करत राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी राजेश विटेकर यांच्यावर मोठा विश्वास दाखवल्याची चर्चा या निमित्ताने राजकीय वर्तुळात होत आहे.

ही निवड आपल्यासाठी अनपेक्षित होती, पण पक्षाने दिलेली जबाबदारी नेटाने पार पाडण्याचा आपला प्रयत्न राहील, असे विटेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था आहे, ते चांगले करून परभणीकरांचा प्रवास आरामदायक कसा होईल? या कामाला आपले प्राधान्य असेल. सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, अध्यक्ष पदावर काम करतांनाचा अनुभव आता विधान परिषदेचा आमदार म्हणून काम करताना निश्चितच उपयोगी पडेल. असंही ते म्हणाले.

Rajesh Vitekar
Beed News : विशाळगड प्रकरणी बीड जिल्ह्यात हजारो मुस्लिम बांधव रस्त्यावर; सरकार विरोधात घोषणाबाजी

आमदार आणि राज्य प्रवक्ता म्हणून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात महायुतीचे आमदार निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे विटेकर यांनी यावेळी सांगितले. अजित पवार यांच्याबद्दल बोलतांना अजितदादांबद्दल पुन्हा तेच म्हणजे बोले तैसा चाले असा आमचा नेता आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्हा, मराठवाडा आणि राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस जोमाने काम करेल आणि पक्षाचे अधिकाधिक आमदार निवडून आणेल, असा विश्वास राजेश विटेकर यांनी व्यक्त केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com