Paithan APMC Result News : पैठण भुमरेंचेच, सर्व १८ जागा जिंकल्या, आघाडी फेल..

Shivsena : पैठणमध्ये भुमरेंनी `एकला चलो रे` ची भूमिका घेत भाजपला दूर ठेवले.
Paithan APMC Result News
Paithan APMC Result NewsSarkarnama
Published on
Updated on

Sandipan Bhumre : राज्याचे रोहयो तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्या पैठण बाजार समितीच्या निकालाकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत भुमरेंच्या पॅनलने सर्वच्या सर्व १८ जागा जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीला एकाही जागी विजय मिळवता आला नाही. भुमरे यांच्या शक्तीपुढे पैठणमधील महाविकास आघाडीतील तीनही पक्ष फेल ठरले. पैठण भुमरेंचेच अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.

Paithan APMC Result News
Gangapur APMC Result News : भाजप आमदार बंब यांनी मतदारसंघातील दोन्ही बाजार समित्या जिंकल्या..

शिंदे गटाने केलेले बंड, त्यानंतर झालेले सत्तांतर आणि नव्या सरकारमध्ये मंत्रीपद मिळाल्यापासून संदीपान भुमरे हे विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. (Paithan) पन्नास खोक्यांच्या आरोपांसह त्यांच्या वाईनबार, शेती आणि इतर संपत्तीची देखील राज्यभरात चर्चा झाली. (Shivsena) काही महिन्यांपुर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भुमरेंच्या मतदारसंघातील बिडकीन ग्रामपंचायत ठाकरेंच्या शिवसेनेने जिंकल्यानंतर विरोधक अधिक आक्रमक झाले होते.

बाजार समिती निवडणुकीसाठी राज्यभरात शिंदे गट आणि भाजपने युती केली. मात्र पैठणमध्ये भुमरेंनी `एकला चलो रे` ची भूमिका घेत भाजपला दूर ठेवले. तर दुसरीकडे काॅंग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाची महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) भुमरे यांच्या विरोधात नेटाने मैदानात उतरली होती. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून बाजार समितीवर एकहाती सत्ता असलेल्या भूमरेंनी यावेळीही तिथे इतरांना शिरकाव करू दिलेला नाही.

महाविकास आघाडीचे आव्हान मोडीत काढत भुमरेंनी एकहाती १८ जागा जिंकत बाजार समितीवरील पकड अधिक मजबुत केली. या विजयाने भुमरे यांनी पुन्हा एकदा विरोधकांना तोंडावर पाडले. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय वाघचौरे यांचे पुत्र विशाल, काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष विनोद तांबे अशा मातब्बरांना मैदानात उतरवण्यात आले होते. मात्र त्यांचा टिकाव भुमरेंच्या पॅनलपुढे लागू शकला नाही. सर्व १८ जागा जिंकत भुमरे यांनी पैठणमध्ये आपलाच आवाज असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com