Paithan Political News : भावी आमदार म्हणत छोट्या भुमरेंचा वाढदिवस जोरात..

Sandipan Bhumre : भुमरे स्वतः मला आदेश मिळाला तर मी लोकसभा लढवायला तयार असल्याचे जाहीरपणे सांगत आहेत.
Paithan Political News
Paithan Political NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : राज्याचे रोजगार हमी योजना तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांचे चिरंजीव माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती विलास उर्फ बापू भुमरे यांचा वाढदिवस पैठण विधानसभा मतदारसंघात व शहरात समर्थकांनी साजरा केला. (Paithan Political News) तसा तो दरवर्षी साजरा होतो, पण वडिलांचे मंत्रीपद आणि आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत यंदा तो जोरात साजरा झाला.

Paithan Political News
Mp Omraje Nimbalkar News : उद्धव साहेबांनी कायम मुलासारखे प्रेम, माया दिली...

पैठणसह (Paithan) शहरात ठिकठिकाणी त्यांच्या समर्थकांनी लावलेल्या बॅनरवर विलास भुमरे यांचा भावी आमदार असा उल्लेख करण्यात आला होता. संदीपान भुमरे हे जिल्ह्याचे पालकमंत्री (Marathwada) असले तरी त्यांचा बराचसा भार हा त्यांचे चिरंजीव उचलतात. भुमरे यांना लोकसभेचे डोहाळे लागले आहेत, शिवसेना शिंदे गटाने छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला आहे.

भुमरे स्वतः मला आदेश मिळाला तर मी लोकसभा लढवायला तयार असल्याचे जाहीरपणे सांगत आहेत. (Shivsena) यामागे पैठण विधानसभेचा मतदारसंघ चिरंजीव विलास भुमरे यांच्यासाठी सुरक्षित करणे हा त्यांचा हेतू असल्याचे बोलले जाते. घरात दोनदा मंत्रीपद आल्यामुळे भुमरे पिता-पुत्रांची गाडी सध्या सुसाट सुटली आहे.

अनेक आरोप-प्रत्यारोप विरोधकांकडून होत असले तरी त्याकडे दुर्लक्ष करत भुमरे यांनी आपला मतदारसंघ मजबूत कसा राहील यावर लक्ष केंद्रीत केले आहे. रेणुका देवी शरद सहकारी साखर कारखान्याचा कारभार भुमरे यांनी मुलाकडे सोपवत त्यांना आगामी विधानसभेच्या दृष्टीने तयारी करण्याच्या सूचना दिल्याची देखील चर्चा आहे.

कारखान्याचे बिनविरोध चेअरमन आणि वाढदिवस असा दुग्धशर्करा योग आल्यामुळे विलास भूमरे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. आता प्रत्यक्षात त्यांना विधानसभेची पैठणमधून उमेदवारी मिळते का? मिळाली तर ते विजयी होतील का? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com