Mp Omraje Nimbalkar News : व्यासपीठावरच ओमराजेंकडून `शासन आपल्या दारी`, चा पंचनामा..

Shivsena UT : लोकसेवकांच्या भुमिकेवर शंका उपस्थित करुन त्यांच्या नाकर्तेपणामुळेच असे उपक्रम शासनाला घ्यावे लागत आहेत.
Mp.Omraje Nimbalkar News, Osmanabad
Mp.Omraje Nimbalkar News, OsmanabadSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv : `शासन आपल्या दारी` उपक्रमात खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शासनाच्या कामाचा पंचनामा त्याच कार्यक्रमात करून सगळ्याचीच गोची करुन टाकली. (Mp Omraje Nimbalkar News) शासनाच्या योजना जनतेपर्यंत घेऊन जाण्यासाठी सूरु केलेला उपक्रम जिल्ह्यात मात्र आपलेच हसू केल्यासारखा होऊ लागला आहे. या कार्यक्रमात शासनाच्या योजनांची पोलखोल करायला ओमराजेंनी सूरुवात केल्याने अधिकारी चांगलेच गोंधळुन गेल्याचे दिसत आहे.

Mp.Omraje Nimbalkar News, Osmanabad
Hingoli Loksabha News : भाजपचा दावा, शिंदे गटात शांतता, तर ठाकरे गट सक्रिय..

शासनाच्या विरोधात भुमिका मांडण्यासाठी खासदारांनी शासकीय व्यासपीठाचा चांगलाच उपयोग केल्याचे दिसत आहे. (Osmanabad) शासनाने लोकांना योजनांची माहिती देऊन त्याचा लाभ व्हावा या उद्देशाने `शासन आपल्या दारी` हा उपक्रम काही दिवसापुर्वी सूरु केला आहे. त्याचे अनेक तालुक्यात कार्यक्रम होत असुन त्या कार्यक्रमाला क्वचितच सत्ताधारी आमदार दिसत आहेत.

विरोधी पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimabalkar) यांची मात्र आवर्जुन हजेरी असते. त्यातही सरकारच्या माध्यमातुन सूरु केलेल्या शासकीय कार्यक्रमात उपस्थित नागरीकांसमोर ओमराजे शासनाचे वाभाडे काढतांना दिसत आहेत. (Shivsena) त्यामुळे प्रशासन देखील हैरान झाले असुन सत्ताधारी मंडळीना तर हा उपक्रम राबवावा की नाही? असा प्रश्न पडला आहे.

अगदी केंद्राच्या योजना असो की राज्य शासनाने सूरु केलेल्या योजना, त्याच्या उपयोगीतेबद्दलच खासदारांनी सवाल उपस्थितीत केल्याचे अनेक कार्यक्रमात दिसत आहे. शिवाय जनतेतुनही त्यांच्या भाषणाला टाळ्या पडु लागल्याने प्रशासनाचे अधिकारी सुध्दा गोंधळून गेले आहेत. लोकसेवकांच्या भुमिकेवर शंका उपस्थित करुन त्यांच्या नाकर्तेपणामुळेच असे उपक्रम शासनाला घ्यावे लागत असल्याचे जाहीरपणे सांगितल्याने नागरीकांतूनही ओमराजेंना प्रतिसाद मिळू लागला आहे.

एसटीच्या तिकीट दरात ५० टक्के सवलतीऐवजी गॅस सिलेंडरचे भाव कमी का केले नाही? शेतकऱ्याला दरवर्षी सहा हजार रुपये दिल्याचे सांगता, पण त्यांच्या शेतात असलेले सोयाबीन जेव्हा काढणीला येवून बाजारात जातं तेव्हा भाव निम्मे कसे होतात? त्यात होणारे नुकसान तुमच्या सहा हजारांच्या मदतीने भरून निघणार आहे का? अशा अनेक प्रश्नांमुळे अधिकारी पुरते हैराण झाले आहेत.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com