Latur News: दुर्दैवी - पत्नीच्या प्रचाराचे भाषण संपवून खुर्चीत बसले आणि मृत्यूने गाठले

Amar Nade: सभा स्थगित करून नाडे यांना तातडीने येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथून लातूरला सर्वोपचार केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच नाडे यांचा मृत्यू झाला होता.
AmarBapu Nade
AmarBapu NadeSarkarnama

Murud Gram Panchayat Election: लातूर (Latur) जिल्ह्यातील मुरूड ग्रामपंचायतीच्या (Gram Panchyat) सार्वत्रिक निवडणुकीत (Election) प्रचाराला वेग आला असतानाच बुधवारी (ता. १४ डिसेंबर) रात्री उशिरा धक्कादायक घटना घडली. विरोधी पॅनेलचे प्रमुख, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अमरबापू पुंडलिकराव नाडे (वय ४३) (AmarBapu Nade) यांचा भाषणानंतर काही वेळातच व्यासपीठावरच मृत्यू झाला. नाडे यांच्या पत्नी अमृता या सरपंचपदाची (Sarpanch) निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासाठी प्रचाराचे भाषण केल्यानंतर व्यासपीठावरच हा प्रकार घडला. त्यांच्या मागे पत्नी अमृता, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. (Panel leader dies on stage after speech in Latur)

ग्रामपंचायत सदस्य अमरबापू नाडे यांच्या पत्नी अमृता या निवडणुकीत सरपंचपदाच्या उमेदवार आहे. त्यांच्या व पॅनेलमधील उमेदवारांच्या प्रचारासाठी बुधवारी (ता. १४ बुधवारी) रात्री सार्वजनिक स्टेजवर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. पॅनेलप्रमुख म्हणून नाडे यांनी भाषण केले आणि ते व्यासपीठावरील पत्नी अमृता यांच्या शेजारील खुर्चीत जाऊन बसले.

AmarBapu Nade
Grampanchayat Election : आमदाराच्या प्रचारसभेत राडा; Bjp अन् Ncp च्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली

नाडे यांच्यानंतर ग्रामपंचायत सदस्यपदाचे उमेदवार हणमंतबापू नागटिळक यांचे शेवटचे भाषण सुरू असतानाच काही वेळातच नाडे यांना घाम आला. ते दोनवेळा पाणी प्यायले आणि काही क्षणातच त्यांनी मान टाकली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सभेत एकच धावपळ सुरू झाली. सभा स्थगित करून नाडे यांना तातडीने येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथून लातूरला सर्वोपचार केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच नाडे यांचा मृत्यू झाला होता.

AmarBapu Nade
Konkan News : कोकणात ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का : तब्बल २७ वर्षे मोठ्या पदावर असणारा नेता शिंदे गटात सामील

या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. निवडणुकीत रविवारी (ता. १८) मतदान असताना या घटनेमुळे सर्वांनाच दुःख अनावर झाले आहे. यामुळे सर्व तीनही पॅनेलने प्रचार थांबवत गावात ठिकठिकाणी लावलेले प्रचाराचे बॅनर व पोस्टर रातोरात काढून घेतले आहेत. गावातील बाजारपेठ आज गुरूवारी (ता. १५) बंद ठेवण्यात आली आहे. शाळा व महाविद्यालयेही आज बंद आहेत.

AmarBapu Nade
मोठी बातमी : २४ तासांत खुलासा करा; अन्यथा कारवाई करू : कर्नाटकात जाण्याचा ठराव केलेल्या ११ गावांना बीडीओंची नोटीस

अमर नाडे यांनी गावात अष्टविनायक प्रतिष्ठानच्या माध्यमातून भरीव सामाजिक कार्य केले आहे. प्रतिष्ठानचे अष्टविनायक कनिष्ठ महाविद्यालय आहे. नाडे यांच्यावर गुरूवारी सकाळी त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com