Grampanchayat Election : आमदाराच्या प्रचारसभेत राडा; Bjp अन् Ncp च्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली

Grampanchayat Election : ...यामुळे गावातील विरोधी गट झाला संतप्त
Laxman Pawar
Laxman PawarSarkarnama
Published on
Updated on

बीड : बीड जिल्ह्यात 704 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. यातील 40 ग्रामपंचायती व 47 सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित ग्रामपंचायत निवडणुकीची (Grampanchayat Election )रणधुमाळी अंतिम टप्प्यात आल्याने प्रचार शिगेला पोहचला आहे. दोन्ही बाजूने ताकद लावली जात आहे. सभा, बैठका, भेटीगाठींना उधाण आले आहे. मात्र, अशातच भाजप आमदार लक्ष्मण पवार यांच्या प्रचारसभेत राडा झाल्याची घटना घडली आहे.

गेवराई तालुक्यात आमदार लक्ष्मण पवार, माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी मंत्री बदामराव पंडित यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मात्र, गेवराई तालुक्यातील रुई येथे बुधवारी रात्री भाजप आमदार लक्ष्मण पवार यांच्यात गोंधळ उडाल्याचा प्रकार घडला आहे.

भाजप आमदार लक्ष्मण पवार आपल्या समर्थकांच्या आघाडीच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी गेवराई तालुक्यातील रुई येथे बुधवारी संध्याकाळी गेले होते. या सभेसाठी त्यांच्या उपस्थितीत त्यांच्यासमवेत गेवराईहूनच आलेल्या एका भाजप पदाधिकाऱ्याने आपल्या भाषणात राष्ट्रवादीचे नेते व पदाधिकाऱ्यांवर टीका केली. यामुळे गावातील विरोधी गट संतप्त झाला व घोषणाबाजी आणि हुर्यबाजी सुरु झाली. यानंतर आमदारांच्या समर्थनार्थ गेवराईहून देखील समर्थकांच्या वाहनांचा ताफा आला. मात्र, दोन्ही गटातील जेष्ठ मंडळींनी सामंजस्याची भूमिका घेतल्याने वातावरणातील तणाव निवळला.

याबाबत माहिती मिळताच गेवराईचे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड देखील पोलीस फौजफाट्यासह रुई गावात दाखल झाले. तत्पूर्वी आमदार व त्यांच्यासोबत आलेली मंडळी रवाना झाली होती. मात्र, पुन्हा काही गोंधळ उडू नये यासाठी राठोड पहाटे तीन पर्यंत रुई गावात थांबून होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com