Pankaja Munde : ओबीसी आरक्षणावरून पंकजा मुंडेंचा थेट सरकारलाच इशारा; म्हणाल्या...

OBC Reservation Protester Laxman Hake : राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध असण्याचे काहीच कारण नाही.
Pankaja Munde
Pankaja MundeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षणाची मागणी मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील करत आहेत. त्याला ओबीसी समाजाने विरोध करत आरक्षण बचाव आंदोलन सुरू केले आहे. त्यावर ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण दिले जाईल, असे अश्वासन सरकारच्या वतीने देण्यात येत आहे.

त्यावर ओबसी आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही, ते स्पष्ट करा, असे आव्हानच भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंनी सरकारला दिले आहे. ओबीसी आरक्षण सुरक्षेसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी पाच दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. याकडे मात्र सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचेही मुंडे म्हणाल्या.

पंकजा मुंडे Pankaja Munde यांनी उपोषणस्थळी जात हाके आणि वाघमारेंची भेट घेतली. त्यावेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे हेही त्यांच्यासोबत होते. यावेळी त्यांनी उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर बोलताना त्यांनी सरकारला एक प्रकारचा घरचा आहेर दिला.

पंकजा मुंडे म्हणाल्या, डोंगराच्या दऱ्याखोऱ्यात जीवन जगणारा हा वंचित समाज आहे. त्या समाजाचे काय म्हणणे आहे, ते सरकारने ऐकून घ्यायला हवे. आता सरकारकडून ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देणार असल्याचे बोलले जाते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही, ते समजावून सांगावे, अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.

Pankaja Munde
BJP Politics : लोकसभेला 'घरघर', आता जाणार दारोदार! विधानसभेसाठी भाजपची 'अशी' रणनीती

राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाला Maratha Reservation विरोध असण्याचे काहीच कारण नाही. मात्र गेल्या काही दिवासांपासून चुकीच्या पद्धतीने कुणबी सर्टिफिकेट दिली गेली आहेत. ते आम्हाला अजिबात मान्य नाही, असेही पंकजा यांनी ठणकावून सांगितले.

उपोषणकर्त्यांना रडू कोसळले

पंकजा मुंडे यांचा बीडमधून पराभव झाल्याने चार तरुणांनी आपले जीवन संपवले आहे. त्याचा मुंडेंना धक्का बसला आहे. त्यातच भेटीला आलेल्या मुंडेंना पाहून उपोषणकर्त्यांनाही रडू कोसळले. त्यावर विचारले असता, त्यांनी माझा पराभवातून चार लोकांनी आत्महत्या केल्याने हाके आणि वाघमारे उद्विग्न झाले आहेत. आता लोकांसाठी लढणाऱ्या या माझ्या भावांचे दुःख शासन दरबारी मांडणार असल्याचा शब्दीही मुंडेंनी यावेळी दिला.

Pankaja Munde
Jayant Patil : 'नाव लक्षात राहू द्या..' जयंत पाटील अन् काँग्रेस नेत्यांंमधील वाद चिघळणार; 'त्या' व्हिडिओनं वातावरण तापलं

आंदोलनाकडे लक्ष द्या

लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. त्या आंदोलनाला कायद्याच्या चौकटीत बसवून न्याय देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. त्यानुसार या आंदोलनाला सरकारमधील मोठ्या नेत्यांनी भेट द्यावी. त्यांच्या भावना समजावून घ्याव्यात. या दोघांचे उपोषण सोडण्यासाठीही येथे यावे, असा आग्रहही मुंडेंनी केला.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com