Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीत 23 वरून थेट 9 जागांवर घसरण झाल्याने भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. त्यावर मतांचे गणित मांडत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांनी आपल्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांना बूस्ट करण्याचा प्रयत्न केला. आता तेवढ्यावरच न थांबता विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने प्लॅनही तयार केला आहे.
भाजपने लोकसभेच्या 28 जागा लढवल्या होत्या, त्यातील फक्त 9 जिंकल्या. त्यासाठी विविध कारणे दिली जात असली तरी निवडणुकीत भाजपला सर्वात मोठा फटका बसल्याची चर्चा आहे. लोकसभेत लागलेली घरघर दूर करण्यासाठी भाजपने दारोदार जाऊन मतदारांच्या मनातील शंकांचे निरसन करण्याचा ठरवले आहे.
निवडणुकीच्या निकालांचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत विधानसभेसाठी भाजपने घर घर चलो अभियान हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि मुंबई उत्तरचे खासदार केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आदी वरिष्ठ नेते उपस्थित होते.
या बैठकीत त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारांच्या योजनांबाबत मतदारांना पटवून देण्यासाठी रणनीती आखली आहे. या मोहिमेद्वारे, भाजप दलित, आदिवासी आणि मराठा आदी समाजांना पक्षाचा कार्यक्रम समजावून सांगणार आहे. लोकसभेत झालेल्या गैरसमज दूर करण्यावर भर देणार आहे.
राज्यात सध्या मराठा Maratha Reservation समाजाचे आरक्षणसाठी, तर ओबीसींचे आरक्षण बचावासाठी आंदोलने सुरू आहेत. कांदा निर्यात बंदी आणि महागाईने शेतकरी नाराज आहेत. बेरोजगारीचा प्रश्न गंभीर होत आहे. त्यातच विरोधकांनी खोटा प्रचार केल्याचा आरोप भाजपसह शिंदे गट आणि अजित पवार गटाने केला आहे. त्यासाठी लोकांना घरोघरी जाऊन आपली भूमिका पटवून देण्याचा निर्णय भाजपच्या वतीने घेण्यात आला आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.