Pankaja Munde Daura: दोन महिन्यांच्या सुट्टीनंतर पंकजा मुंडे पुन्हा सक्रिय; कार्यकर्त्यांचा हुरुप वाढला

BJP News: पंकजा मुंडेंच्या देवदर्शन दौऱ्याला सुरवात झाली आहे.
Pankaja Munde
Pankaja Munde Sarkarnama

Beed News: राजकारणातून दोन महिने सुट्टी घेतलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे बुधवारपासून पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत. पंकजा मुंडेंच्या देवदर्शन दौऱ्याला सुरवात झाली असून या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमधील हुरुप वाढला आहे.

पंकजा मुंडेंनी २०१४ मध्ये राज्यात संघर्ष यात्रा काढली होती. त्यानंतर त्यांना राज्याच्या भाजप सुकाणू समितीमध्ये स्थान मिळाले. याबरोबरच भाजप सरकारच्या काळात महत्वाची खातीही मिळाली. मात्र, नंतर पंकजा मुंडेंना पक्षातून एक प्रकारे बाजुला सारल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Pankaja Munde
Rajnath Singh Maharashtra Daura: संरक्षणमंत्री राजनाथसिंह आज महाराष्ट्र दौऱ्यावर; काय आहे कारण ?

विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडेंच्या परळीतील पराभवाला स्वपक्षीय नेत्यांचाच हातभार असल्याचा आरोप पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडून करण्यात आला. यानंतर विधानपरिषदेवर देखील पंकजा मुंडे यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यांना ऐनवेळी डावलले गेल्याचे बोलले जाते.

पंकजा मुंडेंना डावलणे, त्यांच्यावर मध्य प्रदेशची धुरा देणे आणि कोविडच्या काळात त्यांचा मतदारसंघाशी संपर्क तुलनेने कमी झाला. यानंतर वर्षभरापूर्वी राज्यात नव्या राजकीय घडामोडी घडल्या आणि भाजप सत्तेत आले. मात्र, असे असले तरी या परिघापासून पंकजा मुंडे दुरच आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांना सत्तेचा फारसा उपयोग होताना दिसत नाही.

Pankaja Munde
Maharashtra Politics : राष्ट्रवादीचं हातचं राखून वागणं; भाजप-शिंदे गटाचं टेन्शन वाढविणारं...

यातच राज्यात पुन्हा नवे राजकीय समीकरण घडले आणि जिल्ह्याच्या सत्तेची चावी आता राष्ट्रवादीच्या हाती गेली. एवढंच नाही तर भविष्यात पंकजा मुंडेंच्या परळी विधानसभेचे काय, असा पेच देखील निर्माण झाला आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते नाराज असल्याचे दिसून येते.

या सर्व घडामोडीनंतर पंकजा मुंडे या नाराज असल्याच्या चर्चा अनेकदा रंगल्या. यावर माध्यमांमध्ये देखील बातम्या आल्या. मात्र, पंकजा मुंडेंनी यावर स्पष्टीकरण देत सर्व चर्चा फेटाळून लावल्या. यातच दोन महिन्यांपूर्वी माध्यमांसमोरच बोलताना आपण दोन महिने राजकीय सुट्टी घेणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले होते. आता सुट्टी संपताच देवदर्शनाच्या निमित्ताने त्या पुन्हा सक्रीय झाल्या आहेत.

Pankaja Munde
INDIA Mumbai Meet : हमीभावासाठी शेतकरी हातात नांगर घेऊन 'इंडिया' बैठकीच्या सप्ततारांकित हॉटेलात घुसणार..

महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठांचे दर्शन घेण्यासाठी पंकजा मुंडे यांनी शिव-शक्ती दर्शन परिक्रमा सुरु करत पहिला दौरा नांदेडचा केला. या दौऱ्यात त्यांनी माहूरगडावर रेणूकादेवीचे दर्शन घेतले. पंकजा मुंडे यांच्या या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये वेगळाच हुरुप आल्याचे चित्र आहे.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com