Pankaja Munde News : माझी नीतिमत्ता लेची-पेची नाही; सत्व-तत्त्व-नमत्व माझं राजकारण; पंकजा मुंडेंनी घेतला विरोधकांचा समाचार

Pankaja Munde On Politics : "मी राजकारणातून संपले, मी पक्ष बदलणार अशा देखील चर्चा करण्यात आल्या.."
Pankaja Munde
Pankaja MundeSarkarnama
Published on
Updated on

Patoda News : "माझ्या बाबतीत घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी बद्दल सारखीच उलट सुलट चर्चा होत असते. अगदी मी पक्ष बदलला अशा देखील अफवा पसरवल्या जातात, परंतु एवढी लेची पेची माझी नितीमत्ता नाही. मी माझी सात्विकता कधीही ढळू दिली नाही. माझं राजकारण सत्व , तत्व आणि नमत्व अस आहे," अस वक्तव्य करत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. पाटोदा येथे संत भगवान बाबा जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. (Latest Marathi News)

Pankaja Munde
Mungantiwar Upset In BJP : भाजपची मुंबईत बैठक असताना मुनगंटीवार विमान पकडून चंद्रपूरला पोचले; अनुपस्थितीचे कारण आले पुढे...

संपूर्ण महाराष्ट्रभर शिवशक्ती परिक्रमा करून पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यात दिमाखदार प्रवेश केला. पाटोदा येथे भगवान बाबा जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली यावेळी मंचावर खासदार प्रीतम मुंडे, आमदार सुरेश धस , माजी आमदार भीमराव धोंडे, हभप राधाताई महाराज सानप, डॉ. तात्याराव लहाने, राहुल आवारे, वसंत मुंडे आदींची उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, "भगवान बाबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. राजकारणात महिला शक्तीला दुर्लक्षित करून चालणार नाही. माझ्या बद्दल अनेक चर्चा झाल्या, मी राजकारणातून संपले, मी पक्ष बदलणार अशा देखील चर्चा करण्यात आल्या, परंतु मी माझी सात्विकता ढळू दिली नाही."

Pankaja Munde
Satara NCP News : अजितदादांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचा गट सज्ज; दहा हजार कार्यकर्ते कोल्हापूरच्या बैठकीला जाणार

मध्यंतरी सध्याच्या निर्माण झालेल्या गढूळ राजकीय परिस्थितीला कंटाळून मी घरी बसले होते. परंतु मी आता रणात उतरलीये. मला आता माझ्या क्षमतेवर काम करायचंय आणि त्यासाठी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, असे आवाहन देखील यावेळी पंकजा मुंडे यांनी उपस्थित जनसमुदायाला केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com