Satara NCP News : अजितदादांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचा गट सज्ज; दहा हजार कार्यकर्ते कोल्हापूरच्या बैठकीला जाणार

Ramraje Naik Nimbalkar जिल्हा बॅंकेत आज माजी सभापती रामराजे निंबाळकर व नितीन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अजित पवार गट राष्ट्रवादीची महत्त्वपूर्ण बैठक झाली.
Ramraje Naik Nimbalkar, Ajit Pawar, Makrand Patil
Ramraje Naik Nimbalkar, Ajit Pawar, Makrand Patilsarkarnama
Published on
Updated on

Satara AJit Pawar News : उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोल्हापूरच्या बैठकीसाठी जाताना त्यांचा साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे. कराडला प्रीतीसंगमावर जाऊन अभिवादन केल्यानंतर ते वाळवा तालुक्यातून कोल्हापूरकडे रवाना होणार आहेत. कोल्हापूरच्या बैठकीसाठी साताऱ्यातून दहा हजार कार्यकर्ते पवार यांच्यासमवेत जाणार असल्याची माहिती माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर व जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी दिली आहे.

जिल्हा बॅंकेत आज माजी सभापती रामराजे निंबाळकर Ramraje Naik Nimbalkar व नितीन पाटील Nitin Patil यांच्या प्रमुख उपस्थितीत अजित पवार Ajit Pawar गट राष्ट्रवादीची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. रामराजे व नितीन पाटील म्हणाले, उपमुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच अजित पवार सातारा जिल्ह्यात येणार आहेत. त्यानिमित्ताने त्यांचे जंगी स्वागताचे नियोजन करण्यात आले आहे.

सकाळी खेड शिवापर येथून शिरवळ येथे सव्वा अकरा वाजता त्यांचे आगमन होईल. ते जिल्ह्याच्या वतीने त्यांचे विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे ना्‌ईक निंबाळकर, आमदार मकरंद पाटील, नितीन पाटील हे स्वागत करतील. त्यानंतर बारा वाजता आनेवाडी टोल नाका येथे वाई तालुक्यातील कार्यकर्ते त्यांचा सत्कार करतील. दुपारी सव्वा बारा वाजता त्यांचे सातारा तालुका राष्ट्रवादीच्या वतीने वाढे फाटा व बॉम्बे चौकात स्वागत व सत्कार होईल.

दरम्यान, उंब्रज येथे कराड, पाटण तालुक्यातील कार्यकर्ते सत्कार करतील. दुपारी एक वाजता त्यांचे कराडला आगमन होईल. त्यानंतर ते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन अभिवादन करतील. येथे राष्ट्रवादीच्या वतीने त्यांचे स्वागत व सत्कार होईल. त्यानंतर दुपारी दीड वाजता त्यांचे कासेगाव (ता. वाळवा) येथे आगमन होईल.

Ramraje Naik Nimbalkar, Ajit Pawar, Makrand Patil
Jalna News | मनोज जरांगेंच्या मागण्यांवर Ajit Pawar स्पष्टच बोलले | Maratha Reservation

पावणे दोन वाजता त्यांचे पेठनाका येथे आगमन होईल. तेथे कै. नानासाहेब महाडिक यांच्या समाधीचे दर्शन घेऊन नानासाहेब महाडिक इंजिनिअरिंग कॉलेज येथील कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी तीन वाजता त्यांचे येलूर येथे आगमन होईल. तेथे सत्कार व स्वागत स्वीकारल्यानंतर ते कोल्हापूरकडे रवाना होतील.

कोल्हापूरच्या बैठकीसाठी जिल्ह्यातून दहा हजार कार्यकर्ते जाणार आहेत, असेही रामराजे व नितीन पाटील यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोल्हापूरच्या बैठकीसाठी जाताना त्यांचा साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे.

Ramraje Naik Nimbalkar, Ajit Pawar, Makrand Patil
Satara Shivsena News : उद्धव ठाकरे ऑनलाइन मुख्यमंत्री; ते कधी शेतीच्या बांधावर गेलेत...शंभूराज देसाई

कराडला प्रीतीसंगमावर जाऊन अभिवादन केल्यानंतर ते वाळवा तालुक्यातून कोल्हापूरकडे रवाना होणार आहेत. कोल्हापूरच्या बैठकीसाठी साताऱ्यातून दहा हजार कार्यकर्ते पवार यांच्यासमवेत जाणार असल्याची माहिती माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर व जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी दिली आहे.

Edited By Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com