तुमच्यासाठी खुर्च्या ठेवण्याची माझी ऐपत नाही: पंकजा मुंडेचा टोला कोणाला?

Pankaja Munde| Dasara Melava| छत्रपती शिवाजी महाराजांना संघर्ष सुटला नाही, संघर्षाशिवाय नाव होत नाही
Pankaja Munde| Dasara Melava|
Pankaja Munde| Dasara Melava|
Published on
Updated on

बीड : ''मेळावा, सभा म्हटलं की टीका टीप्पणी होते. पंकजा मुंडे आज कोणावर चिखलफेक करणार अशी चर्चा होती. पण आपला मेळावा कोणावर चिखलफेक करणाऱ्यांचा नाही तर चिखल तुडवणाऱ्यांचा मेळावा आहे. अशा शब्दांत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भगवान गडावर आयोजित दसरा मेळाव्यात उपस्थितांना संबोधित केलं. परळीच्या भगवान गडावर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या दसरा मेळाव्यास सुरवात झाली.

''मी कधीही कोणावर खालच्या पातळीची टीका केली नाही, कधी शत्रुवरही टीका करत नाही, वाईट बोलत नाही. पण तुम्ही माझ्यासाठी इथे आलात. हो पाहून मला आनंद झाला. पण तुमच्यासाठी खुर्च्या ठेवण्याचीही ऐपत नाही. तुमची व्यवस्था करण्याचीही माझी ऐपत नाही. तुमच्यासाठी खुर्च्या ठेवल्या असत्या तर हा मेळावा चौपट झाला असता,' असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी शिंदे फडणवीसांना लगावाला.

'आपल्या लोकांना वाटतं आपल्या नेत्याला काहीतरी मिळावं. पण मी जेव्हापासून २०१९ मध्ये पडले तेव्हापासून आपल्या ताईला अमुक तमुक मिळावं, आपल्या नेत्याला वाटत आपल्या नेत्याला काही तरी मिळावं. मी २०१९ ला पडले तेव्हापासून आपल्या ताईला काहीतरी मिळावं असं लोकांना वाटतं, पण मला नाही मिळाल तरी मी नाराज नाही. कोणीही पदाची अपेक्षा करायची नाही. आपल्याला जे मिळालं आहे ते समाजाची ताकद वाढवण्यासाठी मिळाल आहे. पण समाजाच्या भिंंती बांधण्याचा प्रयत्न केला तर त्याला क्षमा नाही. मला पद मिळालं नाही तरी माझी तक्रार नाही. असंही पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

Pankaja Munde| Dasara Melava|
Bharat Gogawale : "आम्ही त्यांना पवारांच्या ताटाखालचे मांजर म्हणायचं का?"

पंकजा मुंडे म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांना संघर्ष सुटला नाही, संघर्षाशिवाय नाव होत नाही, शिवरायांना शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष सुटला नाही. ज्या पक्षात कोणी जात नव्हतं त्या पक्षाचे कमळ घेऊन गोपीनाथ मुंडेंनी आयुष्यभर संघर्ष केला. पण फक्त साडेचार वर्षे सत्ता मिळाली. जोडे उचलणाऱ्यांचं नाव होत नाही. संघर्ष माझ्या रक्तात आहे आणि तो मी करत राहणार, थांबणार नाही, मी संघर्षाला घाबरत नाही. मी वचनाला मुकणार नाही, थकणार नाही, मी कोणासमोरही झुकणार नाही. मी कोणत्याही आगीतून नारळ बाहेर काढायला घाबरत नाही. असा विश्वास पंकजा मुंडे यांनी यावेळी केला.

लोक मला म्हणतात मी गर्दी जमा करते. पण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष मला म्हणाले, ही गर्दी तुमची ताकद आहे. मी गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवत नाहीत, मी पंडीत दीनदयाळ यांचा वारसा चालवते, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वारसा चालवते, असंही त्यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com